Breaking

Thursday, March 14, 2024

शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मध्य व कोकण रेल्वेच्या 'या' १८ विशेष फेऱ्या रद्द https://ift.tt/AYh1QRa

मुंबई : होळीचा सण अवघ्या आठ दिवसांवर आला असतानाच, मध्य आणि कोकण रेल्वेने रोहा ते चिपळूण दरम्यान धावणाऱ्या १८ विशेष रेल्वे फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत अधिकच भर पडणार आहे.कोकणात होळी आणि गणेशोत्सवानिमित्त गावखेड्यात पालखी सोहळे असतात. कामानिमित्त कोकणातील मूळ गाव सोडून शहरात आलेली मंडळी, पालखीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने गावच्या घरी एकत्र येतात. गणेशोत्सवाच्या तुलनेत होळीसाठीची गर्दी कमी असली, तरी नियमित गाड्यांच्या बळावर ही अतिरिक्त प्रवासी वाहतूक शक्य नसते. त्यामुळे मध्य, कोकण आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून होळी विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात येतात.मध्य आणि कोकण रेल्वेने मार्चच्या पहिल्या आठवड्यात होळीतील गर्दीच्या नियोजनासाठी रोहा-चिपळूण विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली होती. मुळात दिवा-रोहा धावणाऱ्या रेल्वेगाडीचा विस्तार चिपळूपर्यंत करण्यात आला. मात्र ही गाडी दिव्याहूनच भरून येणार असल्याने रोह्यापुढील प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांनी विस्तारित गाडीला विरोध करून स्वतंत्र गाडी चालवण्याची मागणी केली होती, असे कोकण विकास समितीने स्पष्ट केले आहे. या मागणीच्या अनुषंगाने रोहा-चिपळूण होळी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली होती. मात्र, रेल्वेने १५ मार्च ते ३० मार्च दरम्यान धावणाऱ्या ०१५९७/८ रोहा-चिपळूण-रोहा मेमूच्या होळी विशेष फेऱ्या रद्द केल्या आहेत, असे आदेश मध्य आणि कोकण रेल्वेने काढले आहेत. कोकणासाठी आधीच मर्यादित फेऱ्या आहेत. त्यात होळी विशेष फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pulvLaX

No comments:

Post a Comment