Breaking

Thursday, March 14, 2024

माढ्यात रणजीतसिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी जाहीर, शिंदेंच्या शिवसेनेला धक्का, जिल्हाप्रमुखांनी साथ सोडली https://ift.tt/rdcjDX8

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही असा निर्धार करत माढा लोकसभा मधील पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कोकाटे यांनी आपल्या सोबत इतर पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.भाजपने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना जो कोणी सहकार्य करेल, त्या कोणत्याही व्यक्तीला आणि पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच भाजप बबनदादा शिंदे यांच्या समर्थनार्थ काम करा असे भाजप सांगत असल्याने आम्ही सामूहिक राजीनामा देत असल्याची माहिती माढा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

बबनदादा शिंदेंच्या विरोधासाठी आणि मराठा आरक्षणासाठी राजीनाम्याचा निर्णय

शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय कोकाटे यांनी अधिक माहिती देताना सांगितले आम्ही राष्ट्रवादीचे आमदार बबन दादा शिंदे, संजय शिंदे यांच्या विरोधात आजवर राजकारण केलं त्यांच्या बाजूनं राजकारण करा अशी भूमिका पक्ष नेतृत्वाची किंवा भाजपची असेल तर ती आम्ही मान्य करणार नाही. माझा राजकीय बळी मी कोणासाठी का देऊ? असा सवाल त्यांनी केला

भारतीय जनता पार्टीने आमच्या विरोधात काम केलं होतं,आता आम्ही देखील विरोधात जाणार

भारतीय जनता पक्षाचे राजकारण हे भ्रष्ट प्रवृत्तीला खत पाणी घालणारे आहे. माढा, आणि करमाळाचे आमदार शिंदे आणि त्यांच्या पिलावळीच्या भ्रष्टाचाराला केवळ अभय दिला असं नव्हे तर खत पाणीही घातलं जात आहे. भारतीय जनता पार्टीने गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या विरोधात काम केलं. आता आम्हीही या निवडणुकीमध्ये भाजप विरोधात काम करणार आहोत,अशी माहिती माढा लोकसभा मतदारसंघातील वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली.Read And

सरकार मध्ये राहून विरोध करता येत नाही म्हणून आम्ही राजीनामा दिला

मराठा ,धनगर,ओबीसी या सर्व आरक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध जातींमध्ये भांडण लावली जात आहेत. महिला विधेयकामध्येही महिलांची फसवणूकच झाली आहे अशा पक्षाचा आम्ही का म्हणून प्रचार करायचा? असा सवालही संजय कोकाटे यांनी उपस्थित केला.भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची आगामी काळात युती राहणार आहे. आम्ही मात्र भाजपच्या उमेदवारा विरोधात काम करण्याचा निर्धार केला असल्याने संभ्रम नको म्हणून पक्षाचे पद आणि पक्ष त्याग करण्याचा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले. यावेळी संजय कोकाटे, विनोद पाटील, रामचंद्र टकले, यशवंत भोसले, विजय पवार, परीक्षित पाटील आदी उपस्थित होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5iyrS8f

No comments:

Post a Comment