Breaking

Wednesday, March 6, 2024

राजधानी दिल्लीची पुन्हा छावणी, बंदोबस्तात मोठी वाढ, शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सज्जता https://ift.tt/BnUbiK8

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: हमीभावाच्या (एमएसपी) मागणीसाठी पुन्हा 'दिल्ली चलो'चा नारा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा बुधवारी २३वा दिवस आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनात हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी सहभागी होत नसून, देशाच्या इतर भागातील शेतकरी दिल्लीत पोहोचतील, असे सांगण्यात आले. अन्य राज्यांतून येणारे शेतकरी दोन-तीन दिवसांच्या आत दिल्लीच्या सीमांवर पोहोचू शकणार नाहीत. तरीही दिल्ली पोलिसांनी सीमांसह विविध भागांत पुन्हा बंदोबस्त वाढवल्याने बुधवारी दिवसभर इंडिया गेट व कॅनॉट प्लेससह विविध प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी कायम राहिली.पोलिसांनी टिकरी, सिंघू आणि गाझीपूर या सीमा, चारही रेल्वे स्थानके, लाल किल्ला, कुतुबमिनार, अक्षरधाम यांसारखी प्रेक्षणीय स्थळे, आनंदविहार, काश्मिरी गेटसारखी आंततराज्य बस स्थानके व दिल्लीतील सहा लाइन्सवरील मेट्रो स्थानकांवरील बंदोबस्त पुन्हा वाढवल्याने राजधानीला पोलिस छावणीचे स्वरूप येत आहे. पोलिस आणि निमलष्करी दलाचे कर्मचारी सीमांवर २४ तास कडक पाळत ठेवून आहेत. जंतरमंतरसह दिल्लीत अनेक ठिकाणी जमावबंदी आदेश लागू आहे. पंतप्रधानांचे निवासस्थान आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या कृष्ण मेनन मार्गावरील घराभोवतीही मोठा फौजफाटा तैनात आहे. पोलिसांनी बॅरिकेड लावून दिल्लीतील रस्ते जागोजागी अंशतः अडवले आहेत. शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी रविवारी चार तासांसाठी देशव्यापी रेल रोको आंदोलनाची हाक दिली आहे.शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी सांगितले, की बुधवारपासून मध्य प्रदेश, बिहार किंवा दक्षिण भारतातून रस्त्याने किंवा रेल्वेने येणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीला पोहोचण्यासाठी सुमारे दोन-तीन दिवस लागतील, त्यामुळे १० मार्चपर्यंत परिस्थिती स्पष्ट होईल. दिल्लीच्या आजुबाजूच्या राज्यांतील शेतकऱ्यांनी पुढे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या शंभू सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी लगेचच दिल्लीच्या दिशेने येत नसल्याचे पंढेर यांच्या निवेदनातून स्पष्ट झाले आहे. तरीही दिल्ली पोलिस कोणतीही जोखीम स्वीकारण्यास या वेळी तयार नाहीत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1x6MDPC

No comments:

Post a Comment