म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : दक्षिण मुंबईत पूर्व मुक्त मार्ग म्हणजेच फ्री वे (ऑरेंज गेट) ते ग्रँटरोड साडेपाच किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग मुंबई महापालिकेकडून उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी आराखडा आणि बांधकामासाठी मुंबई पालिकेने निविदा मागवल्या होत्या. यामध्ये जे. कुमार इन्फ्राने स्वारस्य दाखवत कमी बोली लावल्याने मुंबई महापालिकेने त्यांची निवड करून या महत्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी सोपवली आहे. उन्नत मार्ग साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.उन्नत मार्ग हा दक्षिण मुंबईतील पी. डीमेलो मार्गावरील ऑरेंज गेटजवळ सुरू होणाऱ्या पूर्व मुक्तमार्ग येथून प्रस्तावित करण्यात आला असून तो ग्रँट रोड स्थानक परिसरापर्यंत असेल. पूर्व मुक्त मार्ग ते ग्रँटरोड स्थानक परिसर या सुमारे ५.५६ किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी सध्या ३० ते ५० मिनिटे एवढा कालावधी लागतो. मात्र, भविष्यात उन्नत-मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाल्यानंतर तेवढ्याच अंतरासाठी केवळ सहा ते सात मिनिटांचा कालावधी लागणार आहे.हा मार्ग मध्य रेल्वेच्या हँकॉक पुलाजवळून जाणार असल्याने रेल्वेकडून आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीतूनही जाणार असल्याने ट्रस्टकडूनही या मार्गाच्या संरखेनात काही बदल करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार बदलही झाले. या मार्गाच्या कामांसाठी रेल्वे आणि मुंबई पोर्ट ट्रस्टकडून मुंबई महापालिकेला ना हरकत प्रमाणपत्र मिळणे गरजेचे होते. ते मिळाले, मात्र फ्री वेच्या बाजूला एमएमआरडीएच्या बोगद्याचे काम प्रस्तावित असल्याने तांत्रिक मुद्दे उपस्थित झाले होते. सर्व तांत्रिक समस्या सुटल्याने मुंबई पालिकेने उन्नत मार्ग बांधकामासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यात विविध कंपन्यानी स्वारस्य दाखवले. जे. कुमार इन्फ्राने कमी बोली सादर केल्याने त्यांना हे काम देण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
प्रकल्पखर्चात वाढ
या मार्गिकेच्या कामासाठी ६६२.४२ कोटी रुपये खर्च येणार होता. सागरी किनारी रस्त्याला पूर्व मुक्त मार्गाशी जोडण्यासाठीही हा मार्ग महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. मात्र प्रकल्पाच्या कामात काही बदल करण्यात आल्याने प्रकल्पखर्चातही वाढ झाली आहे. नवीन आराखड्यानुसार आता एक हजार ३३० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले.वाहतूक सुरळीत होणार
उन्नत मार्गामुळे डॉ. बी. आर. आंबेडकर मार्ग, रफी अहमद किडवाई मार्ग, पी. डीमेलो रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग, ग्रँट रोड परिसर आणि मुंबई सेंट्रल या भागातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rUKHMsk
No comments:
Post a Comment