Breaking

Wednesday, March 13, 2024

ताईसाहेबांसाठी काम करण्याची संधी हे भाग्य, मतदान दीड महिन्यांवर, प्रीतम मुंडेंचा कार्यकर्त्यांना संदेश https://ift.tt/hEikTZM

बीड: गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे. बीड लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा नेमका उमेदवार कोण असणार याकडे जवळपास महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. कारण बीड जिल्ह्याची निवडणूक कोणतीही असो ती एकदम रंगतदार असते. यामुळे या निवडणुकांकडे नेहमीच सगळ्यांचे लक्ष राहते. गेल्या दहा वर्षांच्या काळात खासदार असलेल्या यांना संधी मिळणार की असा प्रश्न उभा केला जात होता आणि याचीच चर्चा पाहिला मिळत होती. अखेर भाजपनं पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रीतम मुंडे यांची या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजप नेमका कोणता उमेदवार उभा करणार याचा अंदाज घेत इतर पक्षांनीही आपले उमेदवार आत्तापर्यंत जाहीर केले नाहीत. ता बीड जिल्ह्यात भाजपचा उमेदवार कोण हे जाहीर झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही पदावर नसलेल्या मात्र भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडेंकडे आता बीड लोकसभेची उमेदवारी आली आहे. Read And खासदार प्रीतम मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्याचं मनोबल वाढवण्यासाठी मेसेज करत शुभेच्छा दिल्या आहेत. या मेसेजमध्ये टीम बीड जिल्हा या सर्वांचे खूप खूप अभिनंदन, ताई साहेबांसाठी प्रत्यक्षात काम करण्याची संधी मिळाली आहे. हे आपलं भाग्य आहे आणि मतदान अवघ्या दीड महिन्यावर आलं आहे. यासाठी आता जोरदार तयारी करूयात असे मेसेज कार्यकर्त्यांच्या ग्रुप वर प्रीतम मुंडे यांनी पाठवले आहेत. सर्वांना मेसेज पाठवतं प्रीतम मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत यावर कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आज पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीचा जल्लोष साजरा करताना पाहायला मिळाले. पंकजा मुंडे यांना पक्षाकडून लोकसभा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या जागी उमेदवारी घेणार नसल्याचं म्हटलं होतं. आता पक्ष नेतृत्त्वानं पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे. प्रीतम मुंडे यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/L3my0tA

No comments:

Post a Comment