मुंबई : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुखावलेले यांनी अजित पवार गटाला रामराम करण्याचा निर्णय घेऊन गुरूवारी सायंकाळी चार वाजता ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके यांची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्याच अनुषंगाने मागील दोन वर्षापासून ते लोकसभेची तयारी करत आहेत. परंतु महायुतीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याने किंबहुना विद्यमान खासदार भाजपचा असल्याने साहजिक सुजय विखे यांना पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली. त्यामुळेच निलेश लंके यांनी पवार गटात प्रवेश करून विखेंविरोधात शड्डू ठोकण्याची तयारी केली आहे.लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत जायचे, की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच राहायचे, अशा कोंडीत सापडलेले पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी अखेर शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलाय. निलेश लंके परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. खासदार अमोल कोल्हे यांनीही लंकेंना परतीची साद घातली होती. अखेर भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या यादीत सुजय विखे यांचं नाव जाहीर झाल्याने लंके यांच्या पवार गटातील पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
लंके तुतारी फुंकणार!
गुरुवारी सायंकाळी निलेश लंके हे शरद पवार यांच्या उपस्थितीत घरवापसी करतील. पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. याच पत्रकार परिषदेत निलेश लंके आपली भूमिका स्पष्ट करून विखेंविरोधात लढाईचं रणशिंग फुंकतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार लंके हे शरद पवार गटात घरवापसी करणारे पहिलेच आमदार ठरणार आहेत. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातली गणिते लक्षात घेऊन लंकेंची उमेदवारी विखेंना जड जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.अहमदनगर दक्षिणची गणिते कशी आहेत?
अहमदनगर दक्षिणमध्ये विखेंचे पक्षांतर्गत वैरी जास्त आहेत. भाजपमध्ये असलेले आमदार राम शिंदे, युवा नेते विवेक कोल्हे उघड उघड लंके यांना मदत करताना दिसून येतात. दुसरीकडे नगर शहर आणि पारनेरमधून स्वत: निलेश लंके आमदार आहेत. कर्जत जामखेडमधून रोहित पवार आणि राहुरीमधून प्राजक्त तनपुरे लंके यांना अधिक मताधिक्यासाठी प्रयत्न करू शकतात. इकडे श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते आणि शेवगावमध्ये मोनिका राजळे आमदार असल्या तरी राष्ट्रवादीचा विरोधी गट (श्रीगोंदा-राहुल जगताप आणि शेवगाव-बबनराव ढाकणे) जोरदार सक्रिय आहे. त्यामुळे लंके विरुद्ध विखे ही लढत तुल्यबळ मानली जातीये.माणूस हा नेहमी खेळाडू पाहिजे, दोन दिवसांपूर्वीच दिले होते संकेत
मी लोकसभा लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यावर मी काहीही निर्णय घेतलेला नाही. माणूस हा नेहमी खेळाडू पाहिजे. स्पर्धा असो किंवा नसो स्पर्धेची तयारी करीत असतो. मी खेळ खेळणारा माणूस आहे. त्यामुळे माणसे जोडत फिरत आहे. राजकारण कधी कोणत्या वळणावर जाईल ते सांगता येणार नाही. त्यामुळे कोणत्या पक्षात जाणार आणि निवडणूक लढवायची, की नाही याबद्दल आताच बोलता येणार नाही, अशा भावना काही दिवसांपूर्वीच व्यक्त करून लंके यांनी त्यांचे इरादे स्पष्ट केले होते.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KGIklr9
No comments:
Post a Comment