नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'माझा देश माझा परिवार' असं सांगत आहे, ते अत्यंत खोटारडे आहे. दुर्दैवाने विरोधी पक्ष हा मोदींचा खोटारडेपणा उजेडात आणू शकत नाही, अशी टीका करत देशातील आताची परिस्थिती पाहता कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. आरएसएस प्रणित मोदी सरकार हा सर्वसामान्याला देशोधडीला लावत आहे. रिझर्व बँकेने देश कर्जात बुडाला असल्याचे देखील सांगितले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला निवडून दिल्यास २०२६ मध्ये आपला देश कर्जात बुडालेला असेल, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केली. जर देशाला कर्जात बुडवायचे नसेल तर येत्या निवडणुकीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवा असे आवाहनही त्यांनी केले.नवी मुंबईच्या नेहरू येथील रामलीला मैदानात वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने सत्ता परिवर्तन महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वंचित आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जगदीश घरत यांच्या समवेत पदाधिकारी यांनी वंचित आघाडीत प्रवेश केला. मुस्लिम समाज कार्यकर्ते, मारवाडी समाज, मातंग समाज, आदिवासी समाज बांधवांनी देखील प्रवेश केला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी मविआ नेत्यांसारखं भाषण करत मोदींच्या गुजरातधार्जिण्या राजकारणाचा समाचार घेताना आरोपांची राळ उडवली. तसेच मोदी सत्तेत आल्यास महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला जाण्याची भीती व्यक्त करत मविआ नेत्यांची री ओढली.
भेटीला आलेले पंतप्रधान ढोकळा खायला गुजरातला नेले का?
मोदी हे देशाचे नाही तर गुजरातचे पंतप्रधान वाटतात अशी खरमरीत टीका त्यांनी केली. भारत भेटीला आलेले अमेरिकेचे पंतप्रधान ट्रम्प तसेच विविध देशाचे पंतप्रधान मोदींनी गुजरातला नेले. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला दूर करत मोदींनी बाहेरून आलेल्या पंतप्रधानांना गुजरातला ढोकळा खायला नेले होते का? असा सवाल आंबेडकरांनी विचारला.सर्वसामान्यांच्या दारात ईडी दिसेल
२०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या कालावधीत २४ लाखाहून अधिक कुटुंबांनी त्यांची संपत्ती ५० कोटी असल्याचे सांगितले आहे. त्यातील अनेकांनी कारवाईच्या भीतीपोटी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. हीच परिस्थिती १९५० ते २०२४ या कालावधीत फक्त ७ हजार कुटुंब परदेशात गेले होते. मात्र आता सरकारच्या दहा वर्षाच्या कालावधीत जे परदेशात गेले आहेत ते वाड वडिलांची इज्जत जाईल आणि कारवाईच्या भीतीपोटी गेल्याचं सांगत मोदी सरकारला पुन्हा सत्ता दिल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या दारातही ईडी उभी राहील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/8A7TNsr
No comments:
Post a Comment