Breaking

Tuesday, March 26, 2024

नाराज भाजप खासदारांची पत्नी मशाल हाती घेणार? ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता https://ift.tt/JjqaGhP

निलेश पाटील, जळगाव: जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झाला नसल्याने भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी भाजपचे नाराज असलेले विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. भाजपचे उन्मेष पाटील यांचा पत्ता कट केल्याने ते नाराज दिसत आहे. जळगाव लोकसभेत उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी अनेकदा दिल्लीवारी केली. मात्र ही वारी त्यांना पावली नाही. शेवटी स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे उन्मेष पाटील भाजपवर नाराज झाले. पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मी पक्षावर कुठल्याही नाराज नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र हे शरीरातून नाराजी नसून त्यांच्या मनातून नाराजी दिसून येत आहे. आठ दिवसांपूर्वीच भाजपाच्या जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक जळगाव येथे घेण्यात आली. या बैठकीमध्ये देखील उन्मेश पाटील हे गैरहजर दिसून आले. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मला बैठकीबाबत कुठलाही फोन किंवा एसएमएस आलेला नाही. त्यामुळे मी बैठकीला येऊ शकलो नाही. तिकीट डावलल्याने एकदाही उन्मेश पाटील हे जळगाव शहरात भाजपच्या कार्यकर्ता किंवा पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी साठी आलेले नाही. यामुळे त्यांची नाराजी उघड दिसून आली. भाजपने उमेदवारी नाकारल्याने उमेश पाटील यांनी मागील आठवड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची गोपनीय भेट घेतली असल्याचेही माहिती सूत्रांनी दिली होती. आज मातोश्री दरबारात महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली. यात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांचेही नाव त्या ठिकाणी चर्चेत घेण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जळगाव लोकसभेत महाविकास आघाडीकडून भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी प्रबल्य उमेदवाराची गरज महाविकास आघाडीला होती.महाविकास आघाडीकडून भाजपातून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेल्या एडवोकेट ललिता पाटील यांनी देखील शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीचा दावा दाखल केला आहे. ललिता पाटील यांनी तर काही भागात दौरे आणि भेटीगाठी सुरू केले आहे. मात्र भाजपला शह देण्यासाठी प्रबंध उमेदवाराची शोधाशोध महाविकास आघाडी अनेक दिवसांपासून करत आहे. यातच नाराज झालेले उन्मेश पाटील हे महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याने त्यांच्या पत्नी संपदा पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने तिकीट नाकारल्यापासून विद्यमान खासदार उमेश पाटील हे भाजपच्या संपर्कात नाही. महाजन यांनी देखील दोन वेळा संपर्क केला असल्याचे त्यांनी माध्यमांसमोर सांगितले होते. त्यावेळी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. त्यामुळे खरोखर उन्मेष पाटील हे भाजपच्या संपर्कात नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामुळे भाजपला आव्हान देण्यासाठी उमेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरविणार असल्याच्याही चर्चा सुरू आहे.संपदा पाटील या चाळीसगाव तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झालेल्या आहेत. विविध महिलांचे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांची चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात ओळख देखील निर्माण झाली आहे. त्यातच विद्यमान खासदार उमेश पाटील यांच्या पत्नी असल्याने जळगाव जिल्ह्यात त्या बऱ्यापैकी परिचित आहे. यामुळेच महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाने त्यांना उमेदवारी देण्याचा विचार केला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pto1KEW

No comments:

Post a Comment