म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १२ जागांसाठी नावे निश्चित केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी बुधवारी दिली. नवी दिल्लीमध्ये झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय झाला असून गुरुवारी महाविकास आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे. त्यानंतरच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार असल्याचे समजते. या यादीत पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यात देशभरातील लोकसभेच्या जागांवरील इच्छुक उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाल्याच कळते. यात महाराष्ट्रातील एकूण १६ जागांसाठी चर्चा होऊन १२ नावे अंतिम करण्यात आल्याचे कळते. या सर्व नावांबाबत गुरुवारी मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे कळते. या १२ जागांमध्ये कोल्हापूर येथून छत्रपती शाहू महाराज, सोलापूर येथून प्रणिती शिंदे, पुण्यातून रवींद्र धंगेकर, अमरावती येथून बळवंत वानखेडे, गडचिरोली येथून नामदेव किरसान, नागपूर येथून विकास ठाकरे, नांदेडच्या जागेसाठी वसंत चव्हाण, लातूर येथील जागेसाठी शिवाजी काळगे, नंदुरबार येथून गोवाल पाडवी आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे कळते. याबाबत काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून गुरुवारी चर्चा करण्यात येणार असल्याचे कळते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zCwTPGN
No comments:
Post a Comment