आयपीएल २०२४ ची सुरुवात अवघ्या काही दिवसांवर आहे. २२ मार्च रोजी सीझनच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू आणि एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने येणार आहेत. परंतु त्याआधी आरसीबीने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये संघाची नवीन जर्सी लाँच केली आहे. दरम्यान जर्सी लाँच होण्याच्या काही तासांपूर्वी आरसीबीची अधिकृत वेबसाइट क्रॅश झाली होती.आरसीबीची जर्सी पूर्वीप्रमाणे लाल आहे. मात्र यावेळी टी-शर्टच्या वरच्या भागावर काळ्याऐवजी गडद निळा वापरण्यात आला आहे. लाल आणि निळ्या रंगाच्या मिश्रणाने बनलेली जर्सी सोशल मीडियावर काही तासांपूर्वी लीक झाली होती. जर्सी लाँच करण्यापूर्वी विराट कोहलीने महिला आरसीबी संघाची कर्णधार स्मृती मानधनाला मंचावर बोलावले. विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि स्मृती मानधना या तिघांनी एकत्र बटन दाबले, त्यानंतर व्हिडिओ सुरू झाला, ज्यामध्ये विराट कोहली आणि टीमचे इतर खेळाडू नवीन जर्सीमध्ये पोज देताना दिसत होते. यासोबतच फ्रँचायझीने आरसीबीचे नवीन नाव देखील जाहीर केले आहे. आरसीबी अनबोर्स इव्हेंट दरम्यान, आरसीबी जे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर म्हणून ओळखले जात होते, त्याचे नाव आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असे करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, २०१४ मध्ये हे नाव बदलून बंगळुरू करण्यात आले. आरसीबी संघाने नावात कोणताही बदल केला नव्हता. मात्र आता आरसीबी संघाने दीर्घ काळानंतर ते बदलले आहे.नॉर्वेजियन संगीतकार ॲलन वॉकरने आरसीबीच्या जर्सी लाँच सोहळ्याला हजेरी लावली होती. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांनी ॲलन वॉकरच्या नावाने छापलेला आरसीबी टी-शर्ट भेट दिला. दरम्यान, आरसीबीची संपूर्ण टीम, प्रशिक्षक आणि सपोर्टिंग स्टाफही मंचावर उपस्थित होता. यावेळीही आरसीबीचा टायटल स्पॉन्सर 'कतार एअरवेज' असेल. टीमच्या जर्सीवर मोठ्या शब्दात 'कतार एअरवेज' लिहिलेले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lZk74iG
No comments:
Post a Comment