Breaking

Tuesday, March 19, 2024

माजी NCB अधिकारी समीर वानखेडे राखी सावंतविरोधात कोर्टात, दाखल केला ११ लाखांचा मानहानीचा खटला https://ift.tt/dJ84PDV

मुंबई: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झालेल्या ड्रग प्रकरणात चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी अधिकारी समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांनी 'बिग बॉस १४' ची स्पर्धक आणि अभिनेत्री राखी सावंत आणि वकील अली काशिफ खान यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या ड्रग प्रकरणात आरोप असलेल्या मुनमून धमेचाची बाजू खान यांनी मांडली होती. समीर वानखेडे यांनी ११ लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. मुंबईतील मालाड येथील दिंडोशी शहर दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला. जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

समीर वानखेडे यांचे गंभीर आरोप

राखी सावंत आणि अली काशिफ खान यांनी आपली प्रतिमा डागाळण्याचा आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप समीर यांनी केलेत. त्यांनी केलेल्या याचिकेत हे आरोप नमूद करण्यात आले आहेत. त्यांनी अद्याप याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अली काशिफ खान यांनी या मानहानीच्या खटल्याबाबत अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'कायद्याचा अर्थ असा आहे की जेव्हा सत्य लोकहितासाठी बोलले जाते तेव्हा कोणतीही मानहानी होत नाही. आयपीसीच्या कलम ४९९मधील दुसरा अपवाद म्हणजे 'पब्लिक कंडक्ट ऑफ पब्लिक सर्व्हंट्स', म्हणजेच एखाद्या सार्वजनिक सेवकाच्या सार्वजनिक कार्यात त्याच्या वागणुकीबद्दल किंवा चारित्र्याबद्दल सद्भावनेने मत मांडले गेले तर ही त्याची मानहानी होत नाही.'

समीर वानखेडे यांना चोख उत्तर देऊ

सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे अली काशिफ खान म्हणाले. त्यांनी पुढे अशी प्रतिक्रिया दिली की, 'आम्ही या प्रकरणात चोख उत्तर देऊ. जर त्यांनी हे प्रकरण सिद्ध केले तर मी त्यांना ११.०१ लाख रुपये देईन.' दरम्यान याविषयी राखीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

काय म्हणाली होती राखी?

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात जेव्हा एनसीबीने अटक केली होती, तेव्हा राखी सावंत याविषयी बोलत होती. तिने अनेक व्हिडिओ शेअर करून आर्यनला निर्दोष घोषित केले होते. ती असेही म्हणाली होती की, 'तुम्ही लोक सिंह असाल तर सिंहाशी लढा. कोल्हे बनून लहान मुलाची शिकार करू नका.'


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/14TMUjC

No comments:

Post a Comment