म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या सागरी किनारा मार्गाची (कोस्टल रोड) वरळी-मरिन ड्राइव्ह ही एक मार्गिका सोमवारी, ११ मार्चपासून खुली करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने त्याआधीच लोकार्पणाचा बार उडवण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. यांच्या हस्ते या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे.पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘कोस्टल रोड’चे सध्या ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात तीन आंतरबदल व चार वाहनतळांचा समावेश असून, आंतरबदलांची लांबी १५.६६ किमी इतकी आहे. या प्रकल्पात पुलासाठी देशातील पहिलाच एकलस्तंभी पाया आणि सकार्डो वायूविजन यंत्रणा बसवण्यात येणार आहे. समुद्र भिंत बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चार ते पाच टनांच्या महाकाय दगडांमुळे लाटांचा प्रभाव कमी होत असून, दगडांतील पोकळ्यांमुळे सागरी जिवांचे संरक्षणही होत आहे. या मार्गात प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत जमिनीखाली एकूण दोन बोगदे आहेत. त्यांची लांबी प्रत्येकी दोन किमी आहे. या बोगद्यांचा प्रत्येकी व्यास १२.२० मीटर आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा व दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बिंदूमाधव ठाकरे चौक, खान अब्दुल गफार खान रोड, वरळी सी फेस येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणात तीन मार्गिकेची एक बाजू सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वरळीहून मरिन ड्राइव्ह येथे जाता येणार आहे. हा मार्ग सकाळी ८ ते रात्री ८ असे १२ तास सुरू राहणार आहे. उरलेल्या वेळेत ‘कोस्टल रोड’चा उत्तरेकडील मार्ग पूर्ण करण्याचे आणि या मार्गाला वरळी-वांद्रे आणि शिवडी सागरी सेतू जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून विविध कामे पूर्ण करण्यास आणि कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते होणार होते लोकार्पण
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. मात्र त्याच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ते रद्द करण्यात आले. लवकरच लोकसभा निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचे लोकार्पण रखडू नये म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल लोकार्पण करण्याची तयारी करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र तेदेशील बारगळले असल्याचे समजते.लोकार्पण तारखेचा घोळ
हा लोकार्पण सोहळा आधी ९ मार्च रोजी करण्याचे निश्चित झाले होते. पालिकेने त्या तारखेच्या निमंत्रण पत्रिकाही तयार करून ठेवल्या होत्या. अधिकारीही ९ मार्च हीच तारीख सांगत होते. तर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल हे प्रसारमाध्यमांना ११ मार्च ही तारीख सांगत होते. यामध्ये पालिकेचे अधिकारी मात्र तोंडघशी पडले. तारखेत बदल झाला असेल तर तशी माहिती आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना द्यायला हवी होती. ती न दिल्याने तारखेचा गोंधळ निस्तरण्यात वेळ गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xFq4mTL
No comments:
Post a Comment