म. टा. प्रतिनिधी, नागपूर : अनियंत्रित भरधाव कार झाडावर आदळून नदीत बुडाली. यात बाप-लेकाचा मृत्यू झाला तर अन्य एक युवक थोडक्यात बचावला. ही घटना नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.काय घडलं?भय्याजी टाले (वय ६५) आणि त्यांचा मुलगा रवींद्र (वय ३३, दोन्ही रा. तोंडखैरी) अशी मृतांची नावे आहेत. राहुल डोमके (वय ३५) असे थोडक्यात बचावलेल्या युवकाचे नाव असून, तो जखमी आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भय्याजी कळमेश्वर येथील रथयात्रा व मिरवणूक बघण्यासाठी गेले होते. ते घरी न परतल्याने मध्यरात्री रवींद्र व राहुल कारने (एमएच-४३-एएल-९५९१) कळमेश्वरला आले. पहाटे दोघे भय्याजी यांना घेऊन कारने तोंडखैरीकडे जायला निघाले. गोवरी परिसरात रवींद्रचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती झाडावर आदळली. त्यानंतर ती नदीत पडली. यात रवींद्र व भय्याजी यांचा मृत्यू झाला. राहुल जखमी झाला.रात्रभर झाडावर चढून वाचवला जीवकार नदीत पडल्यानंतर राहुलने कारच्या समोरील भागाची काच कशीबशी फोडली. तो कारमधून बाहेर निघाला व जवळीलच झाडावर चढला. रात्रभर झाडाला पकडून राहिला. शनिवारी सकाळी एका नागरिकाला तो दिसला. त्याने कळमेश्वर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक योगेश कमळे, उपनिरीक्षक मनोज टिपले, अंकुश लाखे, अनिल शेख यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी राहुल याला झाडावरून काढले. पाण्यात बुडालेली कार व दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/plHiWU6
No comments:
Post a Comment