Breaking

Monday, April 1, 2024

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, सेलू-धेंगली पिंपळगाव दरम्यान रेल्वेलाइन ब्लॉक; वाचा वेळापत्रक https://ift.tt/7wxgV0m

छत्रपती संभाजीनगर : सेलू- धेंगली पिंपळगाव दरम्यान दोन, सहा आणि नऊ एप्रिल या तिन दिवसांसाठी लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. या लाइन ब्लॉकमुळे परभणी ते जालना मार्गावर धावणाऱ्या सहा रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला.

दोन, सहा आणि नऊ एप्रिल २०२४ रोजी उशिरा धावणाऱ्या गाड्या

- रेल्वे क्रमांक १७६१७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हजूर साहिब नांदेड तपोवन एक्स्प्रेस जालना ते सेलू दरम्यान १३५ मिनिटे उशिरा धावेल.- रेल्वे क्रमांक १२७८८ नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस जालना ते सेलू दरम्यान १०५ मिनिटे उशिरा धावेल.- रेल्वे क्रमांक १७२३२ नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस जालनात सेलू दरम्यान १०५ मिनिटे उशिरा धावेल- रेल्वे क्रमांक १७६३० नांदेड – पुणे एक्स्प्रेस नांदेड-मानवत रोड दरम्यान ९० मिनिटे उशिरा धावेल.- रेल्वे क्रमांक १७६६१ काचीगुडा-रोटेगाव एक्स्प्रेस प्रवासात २४० मिनिटे उशिरा धावेल

उशिरा सुटणारी रेल्वे

रेल्वे क्रमांक १७६५० छत्रपती संभाजीनगर - हैदराबाद एक्स्प्रेस दोन, सहा आणि नऊ एप्रिल २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथून १२५ मिनिटे उशिरा सुटेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Tjh5qIg

No comments:

Post a Comment