Breaking

Sunday, April 14, 2024

धोनीने हार्दिकला षटकार मारल्यावर रोहितची भन्नाट प्रतिक्रीया, पाहा नेमकं केलं तरी काय https://ift.tt/c1hYmF3

मुंबई : महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याला गगनभेदी षटकार लगावला. हे चेंडू एवढा लांब केला की तो षटकार असणार हे नक्की होते. धोनीने जेव्हा हा पहिला षटकार लगावला. त्यावेळी रोहित शर्माने जी प्रतिक्रिया दिली ती चांगलीच व्हायरल झाली आहे.धोनी अखेरच्या षटकात फलंदाजीला आला. त्यावेळी फक्त चार चेंडू बाकी होते. त्यामुळे धोनी यावेळी नेमकं काय करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. धोनी मैदानात उतरला आणि प्रेक्षकांनी मैदाना एकच जल्लोष केला. प्रेक्षकांनी वानखेडेवर धोनी.. धोनी.. असा जोरदार नारा द्यायला सुरुवात केली. हा नारा सुरु असतानाच धोनीने मैदानात एंट्री घेतली आणि शांतपणे तो स्ट्राइक घ्यायला गेला. पीचजवळ पोहोचल्यावर त्याने शिवम दुबेशी थोडी चर्चा केली आणि बॅट घेऊन तो स्ट्राइक घेण्यासाठी सज्ज झाला. हार्दिक पंड्या यावेळी गोलंदाजी करत होता. त्यावेळी हार्दिकने धोनीला पहिलाच चेंडू हा ऑफ स्टम्पच्या जवळ टाकला. धोनीने हा चेंडू हेरला आणि अप्रितम टायमिंगसह मोठा फटका मारला. धोनीने जेव्हा हा फटका मारला तेव्हा तो षटकार जाणार, हे सर्वांना समजले होते. धोनीने हा षटकार मारला आणि त्यानंतर थोड्याच वेळात कॅमेरा गेला तो रोहित शर्माकडे. धोनीचा षटकार यावेळी रोहितने पाहिला. धोनीचा हा पहिला षटकार पाहून रोहित शर्माच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याचे पाहायला मिळाले. रोहितने यावेळी खेळभावना दाखवत धोनीच्या या षटकाराचे कौतुक केले. रोहितने जेव्हा ही प्रतिक्रीया दिली, त्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल व्हायला लागले आहेत. रोहित शर्मा यावेळी धोनीच्या फलंदाजीचा आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळाले. कारण तो धोनीला यावेळी न्याहाळत होता. कारण धोनी जेव्ह मैदानात आला तेवव्हापासून रोहित त्याला पाहत होता. धोनी यावेळी फक्त एका षटकारावर थांबला नाही, तर त्याने त्यानंतर अजून दोन षटकार लगावले. पहिल्या तीन चेंडूमध्येच धोनीने षटकारांची हॅट्रीक केल्याचे पाहायला मिळाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7bCUdMB

No comments:

Post a Comment