नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. विजयवाडा येथे ‘मेमंथा सिद्धम’ बस प्रवासादरम्यान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर दगडफेक करण्यात आली. ते लोकांना अभिवादन करत असताना गर्दीतून हा हल्ला झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवयांच्या वर दगड लागून त्यांना दुखापत झाली आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या शेजारी उभे असलेले आमदार वेल्लमपल्ली यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली आहे. बसमध्येच मुख्यमंत्री रेड्डी यांच्यावर डॉक्टरांनी तातडीने प्राथमिक उपचार केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांनी बसमधून प्रवास सुरू ठेवला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी विजयवाडामधील सिंहनगरमध्ये मुख्यमंत्री रेड्डी रोड शो करत होते. तिथे ते ‘मेमंथा सिद्धम’बस यात्रेसाठी पोहोचले होते. ते बसमधून लोकांना अभिवादन करत होते. त्यांचा ताफा विवेकानंद स्कूल सेंटरजवळ आला आणि इथे मुख्यमंत्र्यांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी एक दगड त्यांच्या डोळ्याच्या वर लागला आणि रक्त येऊ लागलं. त्यानंतर लगेच प्राथमिक उपचार देण्यात आले. उपचारानंतर त्यांनी रोड शो बंद न करता पुन्हा लोकांना अभिवादन करत बसमधून प्रवास सुरू केला.कार्यक्रमात जगन मोहन रेड्डी यांचं स्वागत करण्यात येत होतं. रेड्डी यांच्या समर्थकांनी भव्य पुष्पहार आणला होता. त्यांना क्रेनच्या साहाय्याने पुष्पहार घालण्यात येत होता. यावेळी गर्दीतून कोणी अज्ञाताने त्याच्यावर दगडफेक केल्याची माहिती मिळते आहे. हा हल्ला लक्ष्य करून करण्यात आल्याचं दिसत होतं. घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मुख्यमंत्री आणि आमदार या दोघांनाही निवडणूक प्रचारासाठी खास तयार केलेल्या बसमध्ये तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली. प्रथमोपचार करुन मुख्यमंत्र्यांनी आपला बस प्रवास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.आंध्रप्रदेशात चौथ्या टप्प्यात मतदान आंध्र प्रदेशात एकाच टप्प्यात २५ जागांसाठी मतदान होणार आहे. हे मतदान चौथ्या टप्प्यात असून १३ मे रोजी होणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/fc2bt13
No comments:
Post a Comment