मुंबई : आयपीएल २०१४च्या २७व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा तीन विकेट राखून पराभव केला. मुल्लांपूर येथील यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी (१३ एप्रिल) झालेल्या या सामन्यात राजस्थानला विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य होतं, जे संघाने शेवटच्या षटकात पूर्ण केलं. राजस्थान रॉयल्सचा सहा सामन्यांमधला हा पाचवा विजय असून गुणतालिकेत ते अव्वल स्थानावर आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्जचा सहा सामन्यांतील हा चौथा पराभव ठरला.सामन्याच्या शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी १० धावा करायच्या होत्या. अर्शदीप सिंगने त्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर एकही धाव घेतली नाही. त्यानंतर शिमरॉन हेटमायरने तिसऱ्या चेंडूवर चौकार संघाला विजयाच्या जवळ नेलं. हेटमायरने चौथ्या चेंडूवर दोन धावा केल्या. त्यानंतर हेटमायरने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकत राजस्थानला विजय मिळवून दिला. पंजाब किंग्जने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत ८ गडी गमावून १४७ धावा केल्या. पंजाबसाठी आशुतोष शर्माने १६ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. यावेळी त्याने तीन षटकार आणि एक चौकार मारला. जितेश शर्माने २९ तर लियाम लिविंगस्टोनने २१ धावा केल्या. इतर फलंदाज खास कमाल करू शकले नाहीत. दुसरीकडे राजस्थान रॉयल्ससाठी केशव महाराज आणि आवेश खानने २-२ विकेट घेतल्या. तर कुलदीप सेन, युजवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्टने एक-एक विकेट घेतली. या सामन्यासाठी दोन्ही संघात मोठे बदल करण्यात आले होते. पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन किरकोळ दुखापतीमुळे या सामन्यामध्ये खेळू शकला नाही. त्यामुळे शिखर धवनच्या गैरहजेरीत सॅम करनने पंजाब किंग्सची धुरा सांभाळली. दुसरीकडे जोस बटलर आणि रविचंद्रन अश्विनने राजस्थानविरुद्ध खेळण्यासाठी उतरले नव्हते. आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आतापर्यंत २७ मॅच खेळल्या गेल्या. यात राजस्थान रॉयल्सने १६ सामने जिंकले आणि पंजाब किंग्जने ११ सामने जिंकले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/yebtqfK
No comments:
Post a Comment