Breaking

Sunday, April 21, 2024

भरधाव डीजे वाहनाची दुचाकीला टक्कर, भीषण अपघातात दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू https://ift.tt/Fxr1lYg

शुभम बोडके, नाशिक : नाशिकमधील एकलहरे गावात मळे परिसरात पाण्याचा जार घेऊन जात असताना दुचाकी आणि डीजे वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन शाळकरी मुलं गंभीर जखमी झाली होती. त्यांच्यावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र अखेर या दोन्ही शाळकरी मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता.१६ एप्रिल) रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दुचाकी आणि डिजे वाहनाचा अपघात झाला होता. एकलहरेला अखंड हरिनाम सप्ताहाला या दिवशी सुरूवात झाली. पिण्याच्या पाण्याचा जार किर्तांगळी गावातून घेऊन आगणमळा भागात शेती वस्तीकडे शाळकरी मुले मोटारसायकल वरुन जात होती. त्यावेळी डीजे गाडी आणि त्यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला. त्यात पार्थ सोमनाथ चव्हाणके (वय १४) याचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर दुसरा अति गंभीर अभय नामदेव चव्हाणला (वय १४) उपचारासाठी पाठविण्यात आले. नाशिकला उपचार सुरू असताना अभयचा १७ एप्रिल रोजी उपचाादरम्यान मृत्यू झाला आहे. दोन्ही शाळकरी मुले वडांगळीच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात आठवीत शिकत होते. शेतकरी नामदेव चव्हाण यांचा एकुलता मुलगा आहे. अपघातात दोन्ही शेतकरी कुटुंबातील कष्टाळू मुलांचा मृत्यू झाल्याने एकलहरे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.एकलहरे परिसरात झालेल्या या अपघातात डीजे गाडी भरधाव वेगाने जात असताना हा अपघात घडला होता. यावेळी दुचाकीवरुन पाणी घेऊन जाणाऱ्या दोन शाळकरी मुलांना गंभीर दुखापत झाली होती. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर दुसरा हा गंभीर जखमी असल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर गंभीर असलेल्या अभयचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील डीजे वाहन चालकाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून अधिक माहिती पोलीस घेत आहे. मात्र या अपघातामुळे परिसरातील कमी रुंदीचे रस्ते या अपघातांना कारणीभूत ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र आता स्थानिक प्रशासनावर नागरिकांकडून रोष व्यक्त केला जातो आहे. या अपघातात दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्यामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wT1fUJX

No comments:

Post a Comment