Breaking

Thursday, April 11, 2024

मुंबई हादरली! चोरीच्या संशयातून भर वस्तीत तरुणाला संपवलं, मालवणीतील घटना https://ift.tt/IHTCJbK

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : दुचाकी चोरी करत असल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाडच्या मालवणी येथे हत्येची ही घटना उघड झाली आहे. सचिन जैस्वाल असे मृत तरूणाचे नाव असून याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.चारकोप येथून सचिन हा मित्र आकाश सोबत मालवणीच्या गेट क्रमांक ८ येथे बुधवारी अमलीपदार्थ घेण्यासाठी गेले होते. आकाश हा दुचाकीजवळ रस्त्याच्या कडेला उभा होता तर सचिन वस्तीमध्ये गेला. बराच उशीर झाला तरी सचिन बाहेर न आल्याने आकाश आतमध्ये पाहायला गेला. रात्री साडे दहाच्या सुमारास मालवणीच्या गेट नंबर ८ जवळ काही लोक जमले होते. त्या ठिकाणी सचिन बेशुद्ध अवस्थेत पडला होता. आकाशने त्याच्या तोंडावर पाणी मारले. मात्र काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.सचिन हा वस्तीमध्ये लावण्यात आलेली दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करत होता. असा संशय आल्याने त्याला लाथाबुक्यांनी तसेच बांबूने माराहाण करण्यात आली. अशी माहीती आकाशला स्थानिकांनी दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qkjo8ZJ

No comments:

Post a Comment