Breaking

Thursday, April 11, 2024

ठाकरेंचे मुंबईप्रेम पुतना मावशीचे; मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांचा आरोप https://ift.tt/Om08gHF

मुंबई : मुंबई रेल्वेच्या विकासासाठी स्थापन झालेल्या महामंडळासाठी (एमआरव्हीसी) केंद्र, राज्याने वाटा देणे आवश्यक असते. परंतु, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी दोन वर्षांत महामंडळास एक पैसाही दिला नाही. उलट मेट्रोच्या मार्गिका सेना भवनासमोरून जाणार नाहीत याचीही तरतूद केली, असा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष यांनी गुरुवारी केला. मुंबईत जी कामे झाली ज्याचे श्रेय उद्धव ठाकरे हे करून दाखवले म्हणून घेतात, मग जे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत त्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न त्यांनी विचारला. मुंबई पालिका हाती असतानाही शहराचा विकास झालेला नाही, त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही केला. आदित्य ठाकरे यांनी मुंबईसाठी काय केले, त्यांना मुंबईतले प्रश्न, इथली संस्कृती यांची जाण तरी आहे का, गिरणी कामगार, झोपडपट्टीतील प्रश्नांवर ते कधी बोलले आहेत का, असेही शेलार म्हणाले.मुंबईच्या पर्यावरणाच्या स्थितीलाही शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरले. आघाडी सरकारच्या काळात प्रीमियममध्ये ५० टक्के सूट मिळाली त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी धडाधड परवानग्या घेत बांधकामांना सुरुवात केली. यात विकासकांना १२,५०० कोटी रुपयांचा फायदा झाला, त्यातून किती जणांना मलिदा मिळाला ही वेगळी गोष्ट. परंतु शहरात एकावेळी सुरू असणाऱ्या बांधकामांच्या तुलनेत दहापट जास्त बांधकामे सुरू झाली. त्यामुळे हवेत धूलिकण वाढून हवेची गुणवत्ता झपाट्याने घसरली. तीच गोष्ट देवनार डम्पिंग ग्राऊंडची, त्याचा कधीही विचार न केल्याने एक वेळ अशी आली की कचऱ्याचे ढिगारे वाढल्याने विमानांच्या फनेल झोन बदलण्याची मागणी झाली, असे शेलार यांनी सांगितले.उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबई पालिका, मुख्यमंत्रिपद असताना झोपडपट्टी पुनर्वसनावर काहीही काम न झाल्याचा आरोप केला. एमआरव्हीसीच्या माध्यमातून मुंबईतील रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलला आहे. ठाकरे यांनी निधी का उपलब्ध केला नाही, असा प्रश्न उपस्थित केला. मुंबईतील पुनर्वसनाचा मुद्दा गंभीर असून शहरात पुनर्वसनाच्या नावाखाली एफएसआयची लूट झाली. पुनर्वसन प्रकल्पांकडे वेगळ्या नजरेने पाहायला हवे. मुंबईसाठीच्या विकास आराखड्याचा दुरुपयोग करून त्यातून भ्रष्टाचार करण्यातच तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी धन्यता मानल्यानेच दशकांनंतरही तीच परिस्थिती कायम आहे, असा आरोप शेलारांनी केला. मुंबईतील गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्यासाठी वेगळा राज्यमंत्री किवा नगरविकास विभागात एक वेगळा कक्ष असणे काळाची गरज आहे, असेही शेलार म्हणाले.प्रचाराचे मुद्देदेशाच्या स्वातंत्र्यास १०० वर्षे होतील तेव्हा शिक्षण, वाहतूक, कृषी, आरोग्य यांसारख्या सर्व विषयांवर काय काम व्हायला हवे याचा आराखडा पंतप्रधान मोदी व भाजप तयार करत आहे. हेच मुद्दे घेऊन आम्ही देशात नागरिकांसमोर जात आहोत. राज्यात देव, देश धर्मासाठी महायुतीला मतदान करा, असे आवाहन करत आहोत, असे शेलार यांनी सांगितले.आंबेडकरी जनतेच्या मनात रोषभाजप कुठल्याच निवडणुकीला हलक्यात घेत नाही. प्रत्येक निवडणूक पूर्ण गांभीर्याने, सूक्ष्म पातळीवर नियोजन करत लढतो. ही निवडणूकही तशीच लढू, आमच्या विरोधातील उबाठा पक्ष ही दुबळा आहे. अजित पवारांनी पक्ष सोडल्याने राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचीही तीच अवस्था झाली आहे. दुसरीकडे, प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीने दिलेल्या वागणुकीमुळे त्यांना एकत्र लढता आले नाही, याचा आंबेडकरी जनतेच्या मनात रोष आहे, असा दावा शेलार यांनी केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/p6rxvOd

No comments:

Post a Comment