Breaking

Friday, April 26, 2024

विरोधात बोलणाऱ्या नेत्यांना तुरुंगात टाकताय, रशियाचा पुतीन आणि तुमच्यात फरक काय? शरद पवारांचा मोदींवर हल्ला https://ift.tt/l7iaXcE

इरफान शेख, सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष यांनी शुक्रवारी एकाच दिवसात तीन सभांना हजेरी लावत विरोधकांच्या मनात धडकी भरवली. सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार यांच्यासाठी शुक्रवारी रात्री पंढरपूर शहरातील शिवाजी चौकात शरद पवारांची सभा पार पडली. या सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर तुफान हल्ला चढवत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन सोलापूरकरांना केले.

मोदी आणि पुतीन यांच्यात फरक काय?

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे आदिवासी राज्याचे आदिवासी मुख्यमंत्री परंतु त्यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्र सरकारवर टीका केली म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तुरुंगात टाकले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तीन वेळा दिल्लीमधून निवडून आले आहेत. दिल्लीत त्यांनी आदर्श काम केले पण मोदींच्या विचारसरणीला विरोध केला, मोदींवर टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकले. महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना (अनिल देशमुख) कारण नसताना याच भाजपने तुरुंगात टाकले. देशाची सत्ता हातात दिली म्हणून मोदी हुकुमशाहाप्रमाणे वागत आहेत. मग रशियाचा पुतीन आणि नरेंद्र मोदी यांच्यात फरक काय? असा सवाल शरद पवार यांनी विचारला.

प्रत्येक भाषणांत नेहरूंवर टीका कशी करू शकता?

देशाच्या पंतप्रधानांनी एका राज्याच्या नेत्यासारखे वागू नये. तसेच ज्यांनी देशासाठी त्याग केला, ज्यांनी देशासाठी आयुष्य खर्ची घातले, त्यांच्यावर बोलताना जपून बोलावे. पंडित नेहरूंनी देशाच्या स्वातंत्र्याकरिता इंग्रजांच्या जेलमध्ये काही वर्षे घालवली. त्यानंतर स्वतंत्र भारताचा पंतप्रधान म्हणून गाडा हाकताना आधुनिक वैज्ञानिक विचारसणी अंगिकारून देशाचा पाया रचण्याचे काम केले. त्यांच्यावर मोदी प्रत्येक भाषणांतून टीका कशी करू शकतात? असा संतप्त सवालही पवार यांनी उपस्थित केला.

प्रणिती आणि धैर्यशीलला लोकसभेत पाठवा, कुठलीच अडचण भासू देणार नाही

शरद पवार यांनी आपल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरूवातीच्या प्रसंगांची आठवण सांगून जसे सुशीलकुमार यांना तरुण वयात विधानसभेत पाठवले, तसेच प्रणिती आणि धैर्यशीलला लोकसभेत पाठवा. आम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी त्यांना मदत करू, कुठलीच अडचण भासू देणार नाही, असा शब्द शरद पवार यांनी सोलापूरकरांना दिला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/f5e1Vql

No comments:

Post a Comment