Breaking

Monday, April 15, 2024

पतीने गळफास तर पत्नीने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवले; दोन लहान मुलं झाली पोरकी https://ift.tt/lObINLu

नांदेड(अर्जुन राठोड) : जिल्ह्यात आठवड्याभरा पूर्वी पतीच्या अपघाती निधनानंतर पत्नीने ही आत्महत्या करून जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली होती. ही घटना चर्चेत असतानाच आज पुन्हा एका दांम्पत्याने कौटुंबिक वादातून आत्महत्या केली आहे. कंधार तालुक्यातील इमामवाडी येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने कंधार तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. रामदास सोपान करेवाड ( वय ३५) आणि वर्षा रामदास करेवाड ( वय ३०) असे दांम्पत्याच नाव आहे. मयत रामदास करेवाड आणि वर्षा करेवाड हे कंधारपासून दोन किलो मीटर असलेल्या इमामवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन लहान आपत्य आहेत. मागील काही दिवसापासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद होत असत. नातेवाईकांकडून दोघांची अनेकवेळा समजूत देखील काढण्यात आली होती. मात्र त्यांच्यातील वाद काही थांबत नव्हता. सोमवारी सकाळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, त्यांना कठोर निर्णय घ्यावा लागला आणि काही वेळातच होत्याच नव्हते झाले. कौटुंबिक वादाला कंटाळून रामदास करेवाड यांनी सोमवारी सकाळी शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या पतीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पत्नी वर्षा हिने देखील गावातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. दांम्पत्याच्या या आत्महत्येच्या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. शिवाय त्यांची लहान दोन मुले आई वडिलांविना पोरकी झाली आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, बीट जमादार शिवाजी सानप, बापूराव व्यवहारे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळ पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही प्रेत कंधार ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. मयत रामदास सोपान करेवाड यांचे चुलत भाऊ संतोष प्रभाकर करेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली बीट जमादार शिवाजी सानप हे करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/bLZQtlS

No comments:

Post a Comment