Breaking

Wednesday, April 17, 2024

फक्त १६ धावा करणारा ऋषभ पंत कसा ठरला सामनावीर, जाणून घ्या काय असतात नियम... https://ift.tt/Lrg8SYk

अहमादाबाद : दिल्लीच्या संघाने गुजरातवर दमदार विजय साकारला. या सामन्यात दिल्लीकडून सर्वाधिक २० धावा जेक फ्रेझरने (२०) केल्या, ऋषभ पंतने या सामन्यात १६ धावा केल्या. पण कमी धावा करूनही पंतला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पंतला सामनावीर पुरस्कार मिळाल्यावर बऱ्याच जणांना धक्का बसला. कारण पंतने सर्वाधिक धावा केल्या नाहीत, पण तरीही त्याला हा पुरस्कार कसा मिळाला हे आता समोर आले आहे.या सामन्यात दिल्लीकडून वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने फक्त १४ धावांत तीन बळी मिळवले. त्यामुळे मुकेशला यावेळी सामनावीर हा पुरस्कार मिळेल, असे वाटत होते. पण मुकेशला यावेळी सामनावीर पुरस्कार मिळाला नाही. दिल्लीला यावेळी इशांत शर्माने दमदार सुरुवात करून दिली. इशांतने दिल्लीला पहिली विकेट मिळवून दिली. पण इशांतलाही यावेळी सामनावीर हा पुरस्कार मिळाला नाही. त्यामुळे सामनावीर पुरस्काराचे नियम काय आहेत, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच आहे.पंतने यावेळी नाबा १६ धावा केल्या. पण पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. पंतने यावेळी दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगला वापर केला. पंतची कामगिरी फक्त एवढ्यावरच थांबत नाही. पंतने या सामन्यात डेव्हिड मिलर आणि रशिद खान यांचे झेल पकडले. त्याचबरोबर शाहरुख खान आणि अभिनव मनोहर या दोघांनाही यष्टीचीत केले. त्यामुळे स्टम्पमागे पंतने यावेळी सर्वाधिक चार विकेट्स पटकावले, त्याचबरोबर कुशल नेतृत्व आणि नाबाद १६ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब, अशी दमदार अष्टपैलू कामगिरी त्याने केली. संघाच्या विजयात सर्वात जास्त हातभार हा पंतने लावला आणि त्यामुळेच त्याला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला. संघाच्या विजयात जो सर्वाधिक हातभार लावतो, त्यालाच सामनावीर हा पुरस्कार दिला जावा, असाच नियम आहे आणि तोच नियम यावेळा पाळला गेला.पंतने या सामन्यात गोलंदाजांना चांगला वापर केलाच, पण यष्टीरक्षणाचा उत्तम नमुनाही दाखवून दिला. या सामन्यात पंतने चमकदार कामगिरी केली आणि त्याचा फायदा दिल्लीच्या संघाला झाला. त्यामुळेच दिल्लीच्या संघाला गुजरातवर दणदणीत विजय साकारता आला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/oLCsGqK

No comments:

Post a Comment