वृत्तसंस्था, भागलपूर (बिहार):‘भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ आणि मूठभर ‘कोट्यधीशां’नी लोकशाही आणि राज्यघटनेला धोका निर्माण केल्याचा आरोप काँग्रेस नेते यांनी शनिवारी केला. बिहारमधील त्यांच्या पहिल्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना, राहुल यांनी आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखालील मागील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारशी केंद्राची तुलना केली. ‘आम्ही शेतकऱ्यांचे चारपट कर्ज माफ केले’, असा दावा त्यांनी यावेळी केला.‘देशातील २२ उद्योगपतींकडे ७० कोटी लोकसंख्येएवढी संपत्ती आहे. देशात ७० कोटी लोक आहेत, जे दररोज १०० रुपयांपेक्षा कमी पगारावर जगतात. गेल्या १० वर्षात अंबानी आणि अदानींसारख्या उद्योगपतींची भरभराट झाली आहे. अनेक राष्ट्रीय संसाधनांवर अदानींचे नियंत्रण आहे. त्यांच्याकडे सर्व बंदरे, विमानतळ आणि ऊर्जानिर्मिती प्रकल्प आहेत,’ असा आरोप गांधी यांनी केला.मोदींनी २२ ते २५ उद्योगपतींचे सुमारे १६ लाख कोटी रुपये माफ केले. आम्ही शेतकऱ्यांचे जितके कर्ज माफ केले, त्यापेक्षा २५ पटींनी मोदी सरकारने उद्योगपतींचे कर्ज माफ केले आहे. हे मनरेगा योजनेच्या २५ वर्षांच्या काळात देण्यात आलेल्या निधीच्या समतुल्य आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ गरिबांना आर्थिक मदत देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे गांधी म्हणाले.गांधी म्हणाले, “काँग्रेस सत्तेवर आल्यास ‘महालक्ष्मी’सारख्या योजनांच्या माध्यमातून गरिबांना मदत करेल. या ‘महालक्ष्मी’ योजने अंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिला सदस्याला थेट रोख हस्तांतरणाद्वारे एक लाख रुपयांची वार्षिक मदत प्रस्तावित आहे. काँग्रेस सशस्त्र दलातील रोजगाराची अग्निपथ योजनाही रद्द करेल, जी चार वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने नोकरी देते. आपले सरकार आल्यानंतर लष्करातील अग्निपथ योजना रद्द करून जुनी भरती पद्धत लागू करण्यात येईल, असेही ते म्हणाले. पंतप्रधान ‘भ्रष्टाचाराची शाळा’ चालवत आहेतनिवडणूक रोख्यांशी संबंधित (इलेक्टोरल बाँड) मुद्द्याचा हवाला देत, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान मोदींवर तीव्र शब्दांत टीका केली. ‘ हे‘भ्रष्टाचाराची शाळा’ चालवत असून, ‘संपूर्ण भ्रष्टाचार विज्ञाना’मधील सर्व विषय ते तपशीलवार शिकवत आहेत,’ असा आरोप त्यांनी यावेळी केला.‘एक्स’वर पक्षाने प्रसिद्ध केलेली व्हिडीओ जाहिरात शेअर करून, त्यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले. या जाहिरातीत निवडणूक रोख्यांचा मुद्दा नमूद करण्यात आला आहे. ‘नरेंद्र मोदी देशात भ्रष्टाचाराची शाळा चालवत आहेत. तिथे ते स्वतः संपूर्ण भ्रष्टाचार विज्ञान या विषया अंतर्गत ‘दान व्यवसाया’सह प्रत्येक धडा तपशीलवार शिकवत आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. छापे टाकून देणग्या कशा वसूल केल्या जातात, देणग्या घेतल्यानंतर ‘वॉशिंग मशीन’ कसे काम करते, यंत्रणांना ‘रिकव्हरी एजंट’ बनवून जामीन आणि तुरुंगवासाचा खेळ कसा खेळला जातो, याबाबीही त्यांनी नमूद केल्या.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Hpl625R
No comments:
Post a Comment