अलिबाग, अमुलकुमार जैन : देशात दडपशाही सुरू असून हुकूमशाहीची भीती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत लोकशाही आणि संविधान वाचवण्याकरता इंडिया आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, देशात आणि राज्यात सत्ताधिकाऱ्यांकडून धडक सही करण्यात येत आहे. केवळ फसव्या जाहिराती आणि जुमलेबाजी करण्यात येत आहे. मागील दहा वर्षात सामान्य जनतेचे जीवन अधिक खडतर झाले आहे. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या ७ मे रोजी इंडिया आघाडी आणि महाआघाडीच्या उमेदवारांना मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन माजी केंद्रीय मंत्री आणि इंडिया आघाडीचे ३२ लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गिते यांनी पेण तालुक्यातील जिते जिल्हा परिषद मतदार संघात आयोजित जनसंवाद दौऱ्यात केले.यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं, की बॅरिस्टर ए.आर.अंतुले, शरद पवार, जयंत पाटील आणि मधुकर ठाकूर यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या सुनील तटकरेंवर मतदार विश्वास ठेवणार नाहीत आणि त्यांना जनता धडा शिकवेल. भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये ५४२ पैकी फक्त १७२ जागाच भाजपला मिळणार असल्याने घाबरलेल्या भाजपने आपकी बार ४०० चा नारा दिला आहे. परंतु नारा देऊन निवडणुका जिंकता येत नाहीत. प्रत्यक्षात अबके बार मोदी सरकार हद्दपार असे निकाल घोषित होतील. या देशात मोदीविरोधी त्सुनामी येणार आहे. यावेळी मोदी पराभूत होऊन राहुल गांधी पंतप्रधान होतील असा विश्वास गीते यांनी यावेळी बोलून दाखवला.यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले की, पेण विधानसभा मतदारसंघातून अनंत गीते यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल. अनंत गीते यांनी त्यांच्या कारकिर्दीत रायगडसह रत्नागिरीमध्ये सर्वाधिक विकास निधी देऊन विकास केला होता. त्यामुळेच येथील जनतेने त्यांना सहा वेळा लोकसभेत निवडून दिले. यावेळीही सर्व रेकॉर्ड मोडून अनंत गीते सर्वाधिक मताधिक्यांनी ३२ लोकसभा मतदारसंघातून निवडून येतील असा दावा जयंत पाटील यांनी यावेळी केला. तटकरेंकडे धनशक्ती असली तरी आमच्याकडे जनशक्ती आहे. इंडिया आघाडीच्या मागे सामान्य जनता खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे गीते यांचा विजय निश्चित आहे. मोदींची गॅरंटी फसवी असून बहुत हुई महंगाई की मार आपकी बार मोदी सरकार अशी जाहिरात करून महागाई दहापट वाढवणाऱ्या मोदी सरकारने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यावेळी जनता त्यांना धडा शिकवेलच. १५ लाखांचे खोटे आश्वासन देणाऱ्या मोदींच्या गॅरंटीवर यावेळी जनता विश्वास ठेवणार नाही. यापूर्वी शेती आणि शेतीमालावर कोणताही जीएसटी नव्हता परंतु मोदी सरकारने शेतीकरता लागणारे खत आणि इतर कीटकनाशकांवर १८ टक्के जीएसटी आकारून शेतकऱ्यांची लूट केली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव न देणाऱ्या मोदी सरकारला या निवडणुकीत सामान्य जनता हद्दपार करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.राष्ट्रवादीचे समन्वय प्रशांत पाटील म्हणाले की, शरद पवार आणि राष्ट्रवादीने सुनील तटकरेंना भरभरून दिलं तरीसुद्धा त्यांनी गद्दारी कली अशा गद्दाराला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. रायगडच्या जनतेने या गद्दाराला टकमक टोकावरून ढकलून द्या त्याचे डिपोजीट जप्त करा असे आवाहन यांनी यावेळी केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Hyr51ON
No comments:
Post a Comment