नागपूर : शहरात सध्या डेटिंग ॲपच्या नावाने हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यात फिल्म इंडस्ट्रीसह मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित, उच्चशिक्षित मुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून हाय प्रोफाईल घरातील तरुणांना शहरातील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये नेत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे. शहरातील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये दलालांच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट सुरू असून, त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून श्रीमंत कुटुंबातील तरुणांना आधी आपल्या जाळ्यात अडकवून नंतर शहरातील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये बोलावतात. यासाठी वेश्याव्यवसायात सक्रिय असलेल्या या मुलींसाठी हॉटेल मालकांकडून ३० ते ४० टक्के कमिशन आधीच निश्चित केले जाते. हॉटेलमध्ये महागडी रूम बुक केल्यानंतर दारू आणि जेवणाची ऑर्डर दिली जाते आणि नंतर पहिल्या भेटीनंतर महागड्या भेटवस्तूंची मागणीही मुलींकडून केली जाते.गेल्या काही महिन्यांपासून नागपूर शहरात नवी दिल्ली, मुंबई, पंजाब, गोवा, काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मॉडेलिंग क्षेत्राबरोबरच टीव्ही क्षेत्रातूनही मुली आल्याची चर्चा आहे. कुणाला संशय येऊ नये म्हणून दलालांच्या माध्यमातून मुली नागपूरच्या मोठमोठ्या हॉटेल्समध्ये राहतात. सध्या वेश्याव्यवसायाचा ट्रेंडही बदलला दिसत आहे. मॉडेलिंगच्या नावाखाली फोटोशूट करण्याच्या बहाण्याने या मुली डेटिंग ॲपच्या माध्यमातून शहरात पोहोचतात आणि येथील मोठ्या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय करतात. शहरातील अनेक हॉटेल्समध्ये हा धंदा सुरू आहे. याला आळा घालण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/8SaF9iE
No comments:
Post a Comment