Breaking

Monday, April 15, 2024

वर्चस्वाच्या लढाईसाठी काका-पुतण्या विरोधकांच्या दारी; पक्षफुटीमुळे जवळचे दूर, दूरचे आले जवळ https://ift.tt/wTEia5F

म. टा. प्रतिनिधी, पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्ष फुटीला सामोरे जात असताना अनेक राजकीय नेत्यांना कालपर्यंतच्या विरोधकांशी हातमिळवणी करावी लागत आहे. सहा दशकांच्या राजकारणात अनेक चढ-उतार पाहिलेल्या शरद पवार यांना आणि त्यांच्यात तालमीत तयार झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांना वर्चस्वाच्या लढाईसाठी एकेकाळच्या विरोधकांशी जुळवून घ्यावे लागते आहे. विरोधकांना कायम नामोहरम करत आलेल्या या दोन जुन्या-जाणत्या नेत्यांना आता याच विरोधकांची दारे ठोठावून पाठीमागे उभे राहण्यासाठी साद घालावी लागते आहे.बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. वरकरणी भाजपवासीय कितीही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधीची ही लढाई असल्याचे सांगत असले तरी ‘बारामती’मध्ये काका विरुद्ध पुतण्या, पवार विरुद्ध पवार तसेच नणंद विरुद्ध भावजय अशीच लढत होत आहे. त्यामुळे थोरले पवार हे लेकीसाठी, तर धाकटे पवार हे पत्नीसाठी मैदानात उतरले आहेत.आतापर्यंत बारामती लोकसभेची संपूर्ण धुरा ही अजित पवार यांच्या खांद्यावर असायची. त्यामुळे नियोजनापासून ते त्याच्या अंमलबजावणीपर्यंत संपूर्ण प्रचाराची धुरा, प्रचार यंत्रणा अजितदादा एकहाती सांभाळत होते. आता वेगळे झाल्याने दोघा पवारांनी पत्नी आणि लेकीसाठी जवळच्यांसह विरोधकांना आपल्या गटात ओढण्यासाठी चढाओढ सुरू केली आहे.दुसरीकडे, अजित पवारही गप्प बसले नाहीत. त्यांनी महायुतीच्या बरोबरीने स्वतः बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. विविध भागात मेळावे घेऊन त्या त्या घटकांना आपण केलेल्या मदतीची जाणीव करून देत तसेच पुढील काही वर्षे राजकारणात कोण राहणार याची जाणीव करून देताना त्या मतदारांसह नेत्यांना आपल्या गोटात ठेवण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार हे विरोधकांच्या दारात जाऊन त्यांच्याशी हातमिळविणी करीत असल्याने मतदारांना रोज नवे धक्के बसू लागले आहेत.अजित पवार यांचे प्रयत्न- पुरंदरमध्ये विजय शिवतारे, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, दौंडमध्ये राहुल कुल यांच्याशी असलेला सुप्त संघर्ष शमविण्यात यशस्वी- बारामतीतील सुपे भागात पाण्यावरून कित्येक वर्ष संघर्ष सुरू असणाऱ्या १५ ते २० गावातील पुढाऱी कार्यकर्त्यांना जवळ करण्यात दोन पावले पुढे -- भोरमध्ये अनंतराव थोपटे यांच्याशी वैर सर्वश्रुत असतानाही सुनेत्रा पवार यांनी सर्वप्रथम त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली.शरद पवार यांचे प्रयत्न- गेल्या ५५ वर्षापासून संघर्ष असलेल्या बारामती तालुक्यातील माजी खासदार संभाजीराव काकडे, बाबालाल काकडे यांच्या कुटुंबीयांची नुकतीच निंबूत येथे भेट- माळेगाव येथील माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांच्या घरी जाऊन भेट- इंदापूरमधील अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/f2RE0Pl

No comments:

Post a Comment