Breaking

Tuesday, May 28, 2024

या एका गोष्टीशिवाय बीसीसीआय प्रशिक्षकाची नियुक्तीच करू शकत नाही, काय आहे नियम जाणून घ्या... https://ift.tt/2a186jx

नवी दिल्ली : हा भारताचा पुढील प्रशिक्षक होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण भारताचा प्रशिक्षक निवडण्यासाठी काही नियम आहेत. त्यानुसार एका गोष्टीशिवाय आपल्या प्रशिक्षकाची निवडच करू शकत नाही, असे आता समोर आले आहे. यांचा बीसीसीआयबरोबरचा करार टी-२० वर्ल्ड कपनंतर संपुष्टात येत आहे. त्यानंतर द्रविड यांना हे पद सोडावे लागेल. त्यासाठी बीसीसीआय आता नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. नवीन प्रशिक्षकासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. २७ मे ही प्रशिक्षक पदासाठी अर्ज पाठवण्याची अखेरची तारीख होती. त्यामुळे ज्यांनी २७ मेपर्यंत आपले अर्ज बीसीसीआयला पाठवले, त्यांनाच या पदासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. पण त्यानंतरही बीसीसीआयला प्रशिक्षकाची निवड थेट करता येणार नाही. कारण त्यासाठी काही नियम बनवण्यात आले आहेत.बीसीसीआयकडे आलेल्या अर्जांची प्रथम छाननी केली जाईल. त्यानंतर यामधून ५-६ अर्ज निवडले जातील, ज्यावर चर्चा केली जाईल. त्यानंतर या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीमध्ये या उमेदवारांशी चर्चा केली जाईल आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर सर्वात महत्वाच्या गोष्टीला सुरुवात केली जाईल. उमेदवारांची मुलाखत झाल्यावर क्रिकेट सुधारणा समितीची एक बैठक आयोजित करण्यात येईल. यावर प्रशिक्षकांच्या उमेदवारांबाबत चर्चा केली जाईल आणि त्यानंतर योग्य उमेदवार कोण आहे, याचा निर्णय घेतला जाईल. हा निर्णय ही समिती बीसीसीआयला कळवेल आणि त्यानंतरच बीसीसीआयला भारताच्या प्रशिक्षकाबबातचा अंतिम निर्णय जाहीर करता येऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत क्रिकेट सुधारणा समितीची बैठक होणार नाही, तोपर्यंत बीसीसीआयला भारताच्या प्रशिक्षकाची निवड करता येणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता क्रिकेट सुधारणा समिती आता काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.भारतीय प्रशिक्षकाची निवड ही पारदर्शकपणे केली जाते, असे बीसीसीआयने नेहमी सांगत असते. त्यामुळे आता यावेळी ही समिती काय निर्णय घेते आणि भारताचा पुढील प्रशिक्षक कोण होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण अजूनर्यंत गंभीरने अर्ज भरला आहे की नाही, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर बीसीसीआयने या उमेदवारांची छाननी केली आहे की नाही, याबाबतही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाची निवड कशी आणि कधी करणार, याची उत्सुकता सर्वांना असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/iYvzOhX

No comments:

Post a Comment