Breaking

Thursday, May 16, 2024

मणीपूर, कुस्तीगीर महिला टाहो फोडत असताना ॲड. उज्ज्वल निकम कुठे होते? ॲड असीम सरोदे यांचा सवाल https://ift.tt/6MIbaep

मुंबई: भाजपवाले ॲड उज्ज्वल निकम यांना कायदा मंत्री करायला निघालेत. पण निकमांनी कधीच कायद्याच्या प्रक्रियेबाबत आवाज उठवलेला नाही. ते विशेष सरकारी वकील म्हणून ठराविकच पद्धतीच्या केसेस लढतात. एकूण कायद्याचं भान असणं ही वेगळी गोष्ट आहे. देशात कायदा धाब्यावर बसवला जात असताना, मणीपूर, कुस्तीगीर महिला टाहो फोडत असताना निकम कुठे होते, असा सवाल ॲड असीम सरोदे यांनी विचारला आहे. ‘निर्भय बनो’च्या वतीने सरोदे बोलत होते. दक्षिण - मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणारे ॲड उज्ज्वल निकम यांचा निष्णांत वकील म्हणून उल्लेख केला जातो. मात्र ॲड निकम यांना कायद्याबाबतचा फार वकुब आहे असं त्यांनी कधी दाखवलेलं नाही, असंही ॲड सरोदे म्हणाले, निकम यांना ॲड सरोदे यांनी जाहीरपणे २० प्रश्न विचारले आहेत. कसाब सारखे अतिरेकी कसे तयार होतात, त्यांची प्रवृत्ती याचा अभ्यास करून त्याविषयी मुळापर्यंत पुढे जाता येईल. कदाचित यांना रोखणंही शक्य होईल, असा विचार सनदी पोलीस अधिकारी सदानंद दाते यांनी मांडला होता. या अभ्यासासाठी यंत्रंणा तयार करण्याची तयारी राज्य सरकारने केली. पण ॲड निकम यांनी अडथळा उभा करून हे होवू दिलं नाही, असा आरोप ॲड सरोदे यांनी केला.राज्यात पक्षांतर करून सरकार पाडण्यात आलं. राज्यपालांनी संसदीय प्रक्रिया डावलली. हे कोणत्या कायदेशीरबाबीत बसतं? यावर ॲड निकम बोललेत का काही? इलेक्ट्रॉल बॉन्डचा मोठा घोटाळा सर्वोच्च न्यायालयाने बाहेर काढला, कायद्याच्या बाजूने ॲड. निकम यावर काही बोललेत का? ३७० कलम हटवल्याचा दावा अमित शहा करतायत. खरंच सविधानातून ३७० कलम हटवलं गेलंय की त्यातलं ब पोटकलम खिळखळं केलंय, याबाबत ॲड निकम काही बोलतील का असा सवालही सरोदे यांनी केला आहे. मणिपूर जळतंय, महिलांची नग्न धींड काढली गेली. कुस्तीगीर महिला खेळाडूंवर भाजप खासदार लैंगिक शोषण करतोय. त्या ब्रिजभूषणला भाजपने संरक्षण दिलं. प्रज्वल रेवण्णांने २२०० मुलींचं शोषण करून व्हिडिओ तयार केले. पंतप्रधान म्हणतात रेवण्णाला मत हे मला मत… या महिलांच्या प्रश्नावर कायद्याच्या भाषेत ॲड निकम काही बोललेत का? महिलांवरील शोषणाबाबत त्यांची काही भूमिका आहे??? असे प्रश्न ॲड सरोदे यांनी विचारले आहेत. ईडी, सीबीआय, अशा यंत्रणा राजकीय हेतूने वापरल्या जातायत, कधीच यावर ॲड निकम बोलले नाहीत. कारण कायदा प्रक्रिया, त्याचं भान, सामाजिक आशय याबाबत ॲड निकम यांना गती नाही, असंही ॲड असिम सरोदे म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/eRMKbJ1

No comments:

Post a Comment