Breaking

Friday, May 3, 2024

सत्ता गेल्यावर फडणवीसांना कोणी नमस्कारही करणार नाही, रवींद्र धंगेकर यांचा घणाघात https://ift.tt/jMDpodL

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी राज्यात ज्या पद्धतीने फोडाफोडीच राजकारण केले, अनेक गुन्हेगारांना जवळ केले, त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्यामुळे हे राज्यातील जनतेला त्यांचे कट-कारस्थान पटलेले नाही. येणाऱ्या पुढच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना नमस्कार देखील कोणी करणार नाही, अशी टीका पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार यांनी केली.पुणे लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचं प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची आज पुण्यात सभा झाली. त्याआधी पत्रकारांनी रवींद्र धंगेकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आता सर्वसामान्य लोक हे आमच्यामागे उभे आहे. कारण सध्याच्या सरकारच्या काळात अनेक चुकीच्या, जाचक, तत्वहिन गोष्टी घडल्या आहेत. त्याचा जनतेला विट आला आहे.रवींद्र धंगेकर म्हणाले, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा आहे. त्यांचे विचार जोपासणारा आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्यासह अनेक मातब्बर नेत्यांनी महाराष्ट्राला पुढे घेवून आले. जनतेचा विकास केला. त्याच मार्गाने पुढे जाण्याऐवजी फडणवीस यांनी गुन्हेगारांना मदत करण्याची, त्यांना सत्तेत बसवण्याची वाट निवडली. अनेक गुन्हेगारांना त्यांनी आशीर्वाद दिला. असे राजकारण त्यांनी थांबवावे, अशी माझी त्यांना विनंती आहे. अन्यथा पुढच्या काळात ते जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा त्यांना नमस्कारही कोणी करणार नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xGgTk0J

No comments:

Post a Comment