Breaking

Monday, May 27, 2024

९ फायनल, ४ संघ पण एकदाही त्याची टीम हरली नाही, केकेआरचा हा खेळाडू आहे तरी कोण पाहा... https://ift.tt/kgXZA4W

चेन्नई : केकेआरच्या संघाने आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली. पण केकेआरच्या संघात एक असा खेळाडू आहे की, जो नवव्यांदा फायनल खेळायला मैदानात उतरला होता. चार संघांकडून तो या ९ फायनल खेळला, पण एकदाही त्याची टीम हरली नाही. प्रत्येक फायनलमध्ये त्याच्या संघानेच जेतेपद पटकावले, असा एक लकी खेळाडू केकेआरच्या संघातही आहे.केकेआरच्या संघाने आयपीएलच्या अंतिम फेरीत चॅम्पियन्ससारखा खेळ केला. या सामन्यात केकेआरने कधीच हैदराबादला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. कारण पहिल्या षटकापासून केकेआरने हैदराबादवर वर्चस्व राखायला सुरुवात केली. मिचेल स्टार्कने केकेआरला सुरुवातीला दोन धक्के दिले, त्यामुळे त्यांचे कंबरडे मोडले. त्यानंतर आंद्रे रसेलने तीन आणि हर्षित राणाने दोन बळी मिळवत हैदराबादला आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले. त्यामुळे हैदराबादवर केकेआरला सहजपणे विजय मिळवता आला. पण या विजयानंतर केकेआरचा असा एक खेळाडू समोर आला आहे की, जो ९ फायनल खेळला पण प्रत्येकवेळा त्याने विजयाची ट्रॉफी उचलली.हा खेळाडू प्रथमच केकेआरकडून खेळला आणि या संघाला आयपीएलमध्ये विजय मिळवता आला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क तीन संघांकडून ८ सामने खेळला होता आणि एकदाही त्याने पराभव पाहिला नव्हता. स्टार्क हा ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून चार फायनलमध्ये खेळला. या चारही सामन्यांत ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले. स्टार्क सिडनी सिक्सर्स या संघाकडून दोन फायनल खेळला, या दोन्ही फायनल सिडनीच्या संघाने जिंकल्या. न्यू साऊथ वेल्स संघाकडून स्टार्क दोन फायनलमध्ये खेळला आणि दोन्ही सामन्यांत संघाने ट्रॉफी उंचावली. स्टार्कचे हे केकेआरबरोबरचे नववे जेतेपद ठरले आहे. आतापर्यंत एकाही फायनलमध्ये स्टार्क ज्या संघात होता ती टीम हरलेली नाही. त्यामुळे मिचेल स्टार्क हा संघांसाठी लकी ठरलेला आहे.केकेआरच्या विजयात मिचेल स्टार्क चमकला. कारण पहिल्याच षटकात त्याने केकेआरला यश मिळवून दिले. त्यानंतर स्टार्कने अजून एक बळी मिळवला आणि हैदराबादला मोठा धक्का दिला. स्टार्कला यावेळी सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KO8ieCU

No comments:

Post a Comment