Breaking

Monday, May 27, 2024

वादळी वाऱ्यासह पावसाने वीज गुल, रात्रीच्या अंधारात रंगला खुनाचा थरार, बुलढाणा हादरलं! https://ift.tt/JU0gbqj

बुलढाणा: जिल्ह्यात मुख्यतः घाटाखालच्या खामगाव शेगाव, मलकापूर नांदुरा, मोताळा, संग्रामपूर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाने थैमान घालत एकच धुमाकूळ घातला. जवळपास दहा तासांपेक्षा जास्त परिसरातील वीज गुल होती. पण त्यातच बुलढाण्यातील खामगाव येथे वरदळीच्या बस स्थानक परिसरात रात्री खुनाचा थरार रंगला. या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार, मृतक प्रकाश गोपीनाथ सोनी (५२) त्यांच्या बसस्थानकासमोरील हॉटेलात बसले असताना विजय सहदेव बढे, विठ्ठल एकनाथ बढे आणि दोन अनोळखी इसम घटनास्थळी आले. १५ दिवसांपूर्वी दुकानावर आलेल्या आमच्या माणसांना धक्का का मारला? असा जाब विचारत कुकरी तीक्ष्ण हत्याराने प्रकाश सोनी यांना भोसकले. छातीत घाव लागल्याने सोनी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जात असताना प्रत्यक्षदर्शीनी एका आरोपीस पकडले. काहींच्या हाताला झटका देत पकडलेला आरोपी खामगाव बाळापूर रस्त्याने धावत सुटला. संतप्त जमावाने पाठलाग करून आरोपीस पकडले. त्यावेळी घटनास्थळी वेळीच पोलीस दाखल झाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी आरोपीला पकडून खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती केले. तर तीन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी गोपाल प्रकाश सोनी, सती फैल यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी विजय सहदेव बढे, विठ्ठल एकनाथ बढे आणि आणखी दोन अनोळखी इसमाविरोधात भादंवि कलम ३०२, ३४ गुन्हा दाखल केला. यातील आरोपी विजय बढे हा केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस असल्याचे समजते. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळी सोडलेली एक कार शहर पोलिसांनी जप्त केली. ही कार शहर पोलीस स्टेशनला लावण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, पैशांच्या वादातून हा खून झाल्याची चर्चा पोलीस वतुर्ळात होत आहे. त्यामुळे शहर पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. शहर पोलिसांनी घटनास्थळाचे सोमवारी दुपारी निरिक्षण केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zw6ZxBS

No comments:

Post a Comment