वृत्तसंस्था, लंडनकतार एअरवेजच्या दोहा ते डब्लिन या विमानाला खराब हवामानामुळे हादरे () बसल्याने रविवारी १२ प्रवासी जखमी झाले. त्यानंतर हे विमान वेळापत्रकानुसार विमानतळावर उतरले, अशी माहिती डब्लिन विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली. सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानात अवघ्या पाच दिवसांपूर्वी अशाच प्रकारे हादरे बसल्याने एका प्रवाशाचे निधन झाले होते, तर अनेक जण जखमी झाले होते.कतार एअरवेजचे क्यूआर०१७ हे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान तुर्कस्तान देशावरून उड्डाण करत असताना, या विमानाला खराब हवामानामुळे हादरे बसले. त्यामुळे सहा कर्मचारी व सहा प्रवाशांना दुखापत झाली. डब्लिन विमानतळावर उतरल्यानंतर, विमानतळ पोलिस अग्निशमन दल तसेच बचाव पथकाने या सर्वांवर आपत्कालीन उपचार केले, अशी माहिती डब्लिन विमानतळाकडून देण्यात आली. दरम्यान, काही कर्मचारी आणि प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना वैद्यकीय उपचार दिले जात आहेत, असे कतार एअरवेजकडून स्पष्ट करण्यात आले.पाच दिवसांपूर्वीच सिंगापूर एअरलाइन्सच्या लंडनहून उड्डाण केलेल्या विमानाला खराब हवामानामुळे प्रचंड हादरे बसण्याची घटना घडली होती. यात अनेक प्रवासी जखमी झाले होते, तर एका ब्रिटीश प्रवाशाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. जखमींपैकी अनेकांच्या मणक्याला दुखापत झाली होती.खराब हवामानामुळे बसल्याने मृत्यू होणे ही अपवादात्मक घटना असली, तरी यामुळे होणाऱ्या दुखापतींचे प्रमाण मोठे आहे. अलिकडच्या काळात खराब हवामानामुळे विमानाला हादरे बसण्याचे प्रमाण वाढत असून हवामानबदल हे याचे संभाव्य कारण असू शकते, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7PfRCDV
No comments:
Post a Comment