Breaking

Monday, May 6, 2024

प्रचारांचा व सभांचा धडका,आरोप प्रत्यारोपांच्या फेरी आणि शक्ती प्रदर्शन; कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला https://ift.tt/Z2VSkGl

कोल्हापूर(नयन यादवाड): गेल्या महिनाभर सुरू असलेला प्रचारांचा व सभांचा धडका, आरोप प्रत्यारोपांच्या फेरी आणि शक्ती प्रदर्शन या सगळ्यानंतर काल लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता झाली. यानंतर उद्या ७ मे रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात १९,३६,४०३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी २,१५६ मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात १८,१४,२७७ मतदार मतदानाचा हक्क बजावणारा एकूण १,८३० मतदान केंद्र या विभागात तयार करण्यात आले आहेत.प्रचाराचा शेवट झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदान कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं होत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर पक्ष बांधणी पासून ते उमेदवार शोधापर्यंत महाविकास आघाडीला मोठी कसरत करावी लागली. तर महायुतीमध्ये अनेक दिग्गज नेते आल्याने उमेदवारी कोणाला द्यायची याचा पेच कायम होता. मात्र अनेक बैठकावर चर्चेअंती महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून ही कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांना तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्यजित आबा पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले तर अपक्ष म्हणून राजू शेट्टी यांनी या निवडणूक रिंगणात उडी घेतली. गेला महिनाभर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार, नितीन गडकरी, बच्चू कडू, यांच्यासह दिग्गज नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार सभा, रॅली घेत आणि आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडत मतदार संघातील वातावरण गरम करून टाकले असून जिल्ह्यातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान प्रचाराचा शेवट झाल्यानंतर उद्या प्रत्यक्ष मतदान पार पडणार असून मतदारराजा आपलं बहुमूल्य मत कोणाला देणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.एकूण ३ हजार ९८६ मतदान केंद्र यासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरीत करण्याचे काम दिवसभर निवडणूक आयोगाकडून सुरू होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामुळे प्रत्येक विधानसभा मतदार संघात त्या त्या ठिकाणावरून मतदान केंद्राकरिता ईव्हीएम मशीन व साधनसामग्रींचे वितरण करण्यात येत होते ही सर्व मतदान पथके साहित्य घेऊन संध्याकाळी ६ वाजे पर्यंत मतदानस्थळी रवाना झाली. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश कोल्हापूर जिल्हयात येत असल्याने यातील शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ मतदारसंघाकरिता त्या त्या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्याना वितरण करण्यात आले असून जिल्ह्यात एकूण ३ हजार ९८६ मतदान केंद्र आहेत. तसेच दोन्ही लोकसभा मतदारसंघातील एकुण ५५ ग्रामीण व शहरी १८ मतदान केंद्र जिल्हयातील वैशिष्टयांवर वेगवेगळ्या थीमवर आधारीत तयार करण्यात आले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जिल्हयात एकुण १५००३ मतदान अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून उद्या मंगळवार दि ७ मे रोजी सकाळी ६ वाजता मतदानाची रंगीत तालीम होईल. प्रत्यक्ष मतदानाला ७ वाजता सुरुवात होणार असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील १७५६ मतदान केंद्रावर सीसीटीव्हीव्दारे निगरानी ठेवली जाणार असून जिल्ह्यात सुमारे ५ हजार पोलिस, ३ हजार होमगार्ड आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या सहा कंपन्या तैनात केल्या जाणार आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PT74BYr

No comments:

Post a Comment