अहमदाबाद: आयपीएल २०२४ची पहिली क्वॉलिफायर १ लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाली. या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा सहज पराभव केला आणि चौथ्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली. संपूर्ण हंगामात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या हैदराबादला या लढतीत चमकदार कामगिरी करता आली नाही. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादला १५९ धावा करता आल्या आणि कोलकाताने विजयाचे लक्ष्य २ विकेटच्या बदल्यात फक्त १४ षटकात पार केले. अर्थात या पराभवाने हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेले नाही. केकेआरकडून झालेल्या या पराभवाचा बदला घेऊन त्यांना विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या हैदराबाद संघाला आता क्वॉलिफायर २ मधून अंतिम फेरीत जाण्याची संधी आहे. आयपीएलच्या फॉर्मेटमध्ये गुणतक्त्यातील अव्वल दोन संघांना अंतिम फेरीत जाण्याची संधी दोन वेळा मिळते. यामुळेच आता हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यातील विजेत्या संघाशी होणार आहे. यातील विजेत्या संघाशी होणाऱ्या लढतीत जर हैदराबादने विजय मिळवला तर २६ मे रोजी चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर केकेआर विरुद्ध हैदराबाद अशी लढत होईल. स्पर्धेत आता २२ मे रोजी एलिमेनेटरची लढत राजस्थान आणि बेंगळुरू यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या लढतीत विजेत्या संघाला हैदराबादशी दोन हात करावे लागतील. बेंगळुरू संघाने सर्वांना धक्का देत एकापाठोपाठ एक असे विजय मिळवत प्ले ऑफचे तिकिटी मिळवले आहे. आता हा संघ राजस्थानला धक्का देतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या लढतीत पराभव होणाऱ्या संघाचे आव्हान संपुष्टात येईल.केकेआरविरुद्धच्या लढतीत हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी योग्य ठरला नाही. संघातील फक्त चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली. तिपाठीने सर्वाधिक ५५ धावा केल्या. त्यांचा २०व्या षटकात ऑलआउट झाला. विजायचे लक्ष्य केकेआरने फक्त १३.४ षटकात पार केले. कर्णधार श्रेयस अय्यरने २४ चेंडूत नाबाद ५८ तर वेंकटेश अय्यरने २८ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/S1iLxQl
No comments:
Post a Comment