अहमदाबाद : राजस्थान रॉयल्सने आरसीबीवर दमदार विजय साकारला आणि त्यांनी क्वालिफायर २ सामन्यात प्रवेश केला आहे. या सामन्यात पराभवासह आरसीबीचे आव्हान संपुष्टात आले आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १७२ धावा केल्या होत्या. पण राजस्थानने या आव्हानाचा दमदार पाठलाग केला. त्यामुळे राजस्थानला आरसीबीवर ४ विकेट्स राखून विजय मिळवता आला आणि त्यांनी क्वालिफायर २ सामन्यात प्रवेश केला. आरसीबीच्या १७३ धावांचा पाठलाग करताना राजस्थानला ४६ धावांची सलामी मिळाली. आरसीबीने सहाव्या षटकात राजस्थानला पहिला धक्का दिला. त्यानंतर यशस्वी जैस्वालने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. यशस्वी यावेळी अर्धशतकाच्या दिशेने कूच करत होता. पण त्याला अर्धशतक मात्र पूर्ण करता आले नाही. यशस्वीला मॅमेरून ग्रीनने बाद केले आणि त्याला ३० चेंडूंत ८ चौकारांच्या जोरावर ४५ धावा करता आल्या. यशस्वी बाद झाला आणि त्यानंतर काही वेळातच राजस्थानचा कर्णधारही बाद झाला.संजू यावेळी मोठा फटका मारण्यासाठी गेला. पण संजूला यावेळी आरसीबीचा फिरकीपटू कर्ण शर्माने चांगलचे चकवले. त्यावेळी दिनेश कार्तिकने कोणतीही चूक केली नाही आणि संजूला बाद केले. संजू यावेळी १७ धावांवर यष्टीचीत झाला आणि त्यामुळे राजस्थानला मोठा धक्का बसला. त्यानंतर राजस्थानचा संघ हा रायन परागवर अवलंबून होता. कारण पराग हा चांगलाच स्थिरस्थावर झाला होता आणि तो मोठी फटकेबाजी करण्यात माहीर असल्याचे सर्वांनाच माहिती होते. तत्पूर्वी, आरसीबीच्या फलंदाजांनाही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. आरसीबीला पहिला धक्का फॅफ ड्यु प्लेसिसच्या रुपात बसला, त्याला १७ धावा करता आल्या. त्यानंतर विराट कोहलीवर संघाची भिस्त होती. कोहली पुन्हा मोठी खेळी साकारणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. पण कोहली यावेळी ३३ धावा करू शकला. पण कोहलीने या सामन्यात इतिहास रचला. कोहलीने या सामन्यात आयपीएलधील ८ हजार धावांचा पल्ला पार केला, जो आतापर्यंत कोणालाही करता आला नाही. कोहली बाद झाल्यावर रजत पाटीदारने ३४ आणि महिपाल लोमरोरने ३२ धावा केल्या. त्यामुळेच आरसीबीला यावेळी १७२ धावा करता आल्या.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Bgl6Ib
No comments:
Post a Comment