Breaking

Saturday, May 11, 2024

Nashik Loksabha: राजाभाऊ वाजेंनी विरोधकांना सुनावलं, थेट इशारा देत म्हणाले- वेळ पडली तर मी गंगेच्या... https://ift.tt/Ok8GpSu

शुभम बोडके, नाशिक: नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शेवटच्या अर्थात पाचव्या टप्प्यात आहे. येत्या २० मे ला नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. वाजे यांना उमेदवारी दिल्यामुळे महायुतीकडून वाजे हे ग्रामीण भागातील आहे त्यांना शहरातील प्रश्नांची काय जाण असणार? वाजे निवडून आले तर ते सिन्नरमधून कारभार बघतील असे अनेक आरोप महायुतीकडून वाजे यांच्या संदर्भात उपस्थित होऊ लागले आहे. मात्र निवडणुकीला काही दिवस बाकी असताना आज नाशिक शहरातील सातपूर येथे ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांची वाजे यांच्या समर्थनार्थ सभा होती. या सभेत राऊतांच्या समोर वाजेंनी या सर्व प्रश्नांवर उत्तरे दिली आहेत. नाशिक शहरातील सातपूर येथे ठाकरे सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची सभा होती. या सभेच्या प्रसंगी राजाभाऊ वाजे यांनी बोलत असताना विरोधकांच्या आरोपांवर आपले मत मांडले आहे. राजाभाऊ वाजे म्हणाले, निष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे मला पक्षाने उमेदवारी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार टिकवण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मतदान केले पाहिजे. राज्यात एक मोठी आघाडी म्हणजेच, महाविकास आघाडी उभी राहिली आहे. मागील दहा वर्षात कोणतीही कामे झाली नाही विकास झाला नाही. त्यामुळे बदल घडवायचा आहे. विरोधक म्हणतात वाजे ग्रामीण भागातील आहे. त्याला शहरातील प्रश्न काय माहित असणार. मी सिन्नरचा आहे. त्यामुळे कारभार सिन्नरवरून करेल, असे देखील आरोप माझ्यावर विरोधक करत आहेत, असं ते म्हणाले.विरोधकांच्या आरोपांवर बोलत असताना वाजे म्हणाले, आज सगळ्यांना आश्वाशीत करतो. सगळ्यांच्या सोयीने मी काम करेल. माझ्या कामाची पद्धत ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की, मी जे काम असेल तेथेच जाऊन काम करतो. वेळ पडली तर मी गंगेच्या बाजूला बसून काम करेन. मी मागील ४५ दिवस प्रचार करतो आहे. मी बघतोय सर्व पण आरोग्यावर कोणतेच काम झाले नाही. त्यामुळे मला जर संधी मिळाली तर मी तुमच्यासोबत बसून तुमचे काम करेल. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांवर लक्ष देऊ नका, असे बोलत राजाभाऊ वाजे यांनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा ग्रामीण आणि शहरी मतदारसंघ आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना शहरातील प्रश्न काय माहित असणार असे आरोप वाजे यांच्यावर वारंवार होत होते. मात्र आज वाजे यांनी आपल्या सर्व आरोपांचे खंडन करून विरोधकांना प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता नाशिक मधील महायुतीकडून शहरी आणि ग्रामीण अशा आरोपांवर आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराने महायुतीलाच अडचणीत आणल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4sAmfvB

No comments:

Post a Comment