नाशिक (शुभम बोडके): नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू असल्यामुळे सध्या येथील राजकीय वातावरण हे चांगलेच तापले आहेत. नाशिक लोकसभेची निवडणूक ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे. महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे तर महायुतीकडून हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील सातपूर येथे संजय राऊत यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली. या सभेत ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केलेल्या विजय करंजकरांवर गंभीर आरोप केले आहे. करंजकरांवर बोलत असताना सुधाकर बडगुजर यांनी एक मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे.ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले, शिवसेनेच्या कार्यालयासाठी सहा लाख रुपये यांनी हडपले. शिवसेनेत राहुन गद्दारी आणि वरवर निष्ठेच्या गप्पा विजय करंजकर मारत होते. सलीम कुत्ता सोबतचे माझे जुने व्हिडिओ व्हायरल केले आणि गुन्हा दाखल केला. हेमंत गोडसे यांचे देखील व्हिडिओ व्हायरल झाले मग त्यांच्यावर गुन्हा का नाही दाखल झाला. हेमंत गोडसे यांची व्हायरल व्हिडिओ ही विजय करंजकरांनीच बाहेर काढली होती असा मोठा गोप्यास्फोट ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला. सुधाकर बडगुजर पुढे म्हणाले, गोडसेंचा व्हिडिओ मला सकाळी सात वाजता विजय करंजकर यांनीच पाठवला आणि व्हायरल करायला सांगितला. गोडसेंना अडचणीत आणत त्यांचा व्हिडिओ व्हायरल करणारे विजय करंजकर होते आणि आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत त्यांचा प्रचार करताय, असा सवाल देखील विजय करंजकर यांना सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित केला. ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आज महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ सातपूर येथील सभेत बोलत असताना हा मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता नाशिकमधील वातावरण हे चांगलेच तापणार असल्याचे देखील पाहायला मिळणार आहे. सुधाकर बडगुजर यांनी केलेल्या आरोपांवर आता विजय करंजकर नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. येणाऱ्या काळात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात मात्र आरोप प्रत्यारोपांची मालिकाही चांगलीच धार पकडेल, असे पाहायला मिळत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/bgeSAGE
No comments:
Post a Comment