Breaking

Sunday, June 16, 2024

'बागबान' सिनेमातील चिमुकला आठवतोय? २१ वर्षांनंतर ओळखता येईना, इंडस्ट्री सोडून आता काय करतो? https://ift.tt/8xzrdOQ

मुंबई : २००३ मध्ये प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, समीर सोनी, सलमान खान, महिमा चौधरी, दिव्या दत्ता, रिमी सेन आणि इतर कलाकारांच्या भूमिका असलेला 'बागबान' चित्रपट तुफान गाजला. या मल्टीस्टारर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. या मल्टीस्टारर सिनेमात एका बालकलाकारानेही भूमिका साकारली होती. राहुल असं त्यांच्या सिनेमातील पात्राचं नाव होतं. राहुल हे पात्र साकारत त्याने यांच्या नातवाची भूमिका केली होती. २००३ मध्ये बाल कलाकार म्हणून भूमिका साकारलेला चिमुकला आज मोठा झाला असून त्याला ओळखता येणंही कठीण आहे.

बागबान सिनेमातील लोकप्रिय झालेला बालकलाकार आता काय करतो?

रवि चोपडा दिग्दर्शित आणि बीआर चोपडा लिखित २००३ मध्ये प्रदर्शित झाला. १० मध्ये तयार झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. सिनेमाने जवळपास ४३ कोटींहून अधिकची कमाई केली होती. सिनेमातील कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीत पडल्या होत्या आणि आजही बागबान सिनेमा अनेकांच्या लक्षात आहे. सिनेमात राहुल नावाचं पात्र एक बालकलाकाराने साकारलं होतं. तो बालकलाकार आता काय करतो? अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या नातवाची भूमिका साकारलेला बालकलाकार राहुल मल्होत्रा उर्फ यश पाठकने सिनेमातून मोठी लोकप्रियता मिळवली. प्रेक्षकांकडूनही त्याला मोठं प्रेम मिळालं. बालकलाकार म्हणून यश पाठकने अनेक सिनेमात काम केलं आहे. गंगाजल, परवाना या सिनेमातही तो बालकलाकार म्हणून दिसला होता.

सिनेसृष्टीत सोडून काय करतोय?

बालकलाकार म्हणून सिनेसृष्टी गाजवलेला यश पाठक आज अभिनेता नसून त्याने सिनेसृष्टी सोडली आहे. मोठं झाल्यानंतर त्याने अभिनय क्षेत्र सोडलं असून आता तो संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. यश पाठव म्युझिक कम्पोजर आणि म्युझिक प्रोड्युसर बनला आहे. सोशल मीडियावर यश सक्रिय असून तो सतत त्याच्या गाण्यांबाबत, आगामी प्रोजेक्ट्सबाबत अपडेट्स देताना दिसतो.

एआर रहमान यांच्यासोबत केलंय काम

बालकलाकार म्हणून गाजलेल्या यश पाठकने एआर रहमान यांच्यासोबत कोक स्टुडिओमध्ये काम केलं आहे. त्याने सोशल मीडियावरुन एआर रहमान यांच्यासोबत काम केल्याची माहिती दिली होती. यशचं स्वत:चं यूट्यूब चॅनेलदेखील आहे. तो आपली गाणी प्रेक्षकांसोबत, चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/NsyYBqp

No comments:

Post a Comment