: मुंबईत जन्मलेला क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर T20 विश्वचषक २०२४ मधील त्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे सध्या बराच चर्चेत आहे. सौरभचे यश सर्वश्रुत असले तरी, त्याच्या तितक्याच कर्तबगार पत्नीबद्दल फारशी कोणाला माहिती नाही.चला तिच्याबद्दल अधिक जाणून घेऊया 'महाराष्ट्र टाइम्स'सोबत. सौरभ नेत्रावळकर यांच्या पत्नीचे नाव देवी स्निग्धा मुप्पला आहे.स्निग्धा सुद्धा सौरव सारखीच महत्वाकांक्षी आहे. सौरभने मुंबईतील सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्यूटर इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आणि नंतर यूएसएमधील कॉर्नेल विद्यापीठातून त्याने मास्टर्स केले. USA संघासाठी खेळण्याव्यतिरिक्त, सौरभ ओरेकल येथे मुख्य इंजिनियर म्हणून पूर्णवेळ काम करतो. त्याचप्रमाणे, त्याची पत्नी स्निग्धा मुप्पाला यांनी कॉर्नेल विद्यापीठातून इंजिनियरिंग आणि कॉम्प्यूटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. तीसुद्धा ओरेकल मध्ये प्रिन्सिपल ॲप्लिकेशन इंजिनीअर म्हणून नोकरीला आहेत. स्निग्धा एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना देखील आहे, बॉलीवू़ड प्रेरित फिटनेसमुळे तिने अमेरिकेत फिटनेस कार्यक्रम सुरु केलाय. स्निग्धाने अमेरिकेत कथक कलेला एका उंचीवर नेवून ठेवलाय ज्याचा आदर्श अमेरिकेतली बरीचजण घेतायत. तिच्या इंजिनियरिंग कारकिर्दीव्यतिरिक्त,स्निग्धा मुप्पला संपूर्ण यूएसएमध्ये कथ्थक नृत्य सादर करते. तिचा नृत्य कार्यक्रम, BollyX, सॅन फ्रान्सिस्को आणि कॅलिफोर्नियामध्ये अनेक वर्षांपासून हिट होतोय. ABC च्या 'Shark Tank' वर तिचा कार्यक्रम दाखविण्यात आले तेव्हा BollyX ने साऱ्याचे लक्ष वेधले होते आणि बरीच चर्चा झाली होती. देवीचे मूळ भारतातील आंध्र प्रदेशात आहे, तर सौरभ मुंबई, महाराष्ट्रातील आहे. त्यांच्या लग्न दक्षिणात्य आणि महाराष्ट्रीयन अश्या दोन्ही पद्धतीने २०२० साली पार पडले. सौरभ आणि देवी हे दोघेही त्यांच्या वैयक्तिक आवडी निवडीचा आदर करताना पाहायला मिळतात. दोघांचे छंद वेगळे असले तरी त्यांच्या नात्यातील वीण घट्ट बांधलेली आहे. दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम कायम दिसते. दोघही एकमेकांच्या इच्छा आकाशा पूर्ण करण्यासाठी एकमेकांना प्रोत्साहन देताना दिसतात. देवी अनेकदा सौरभच्या क्रिकेट सामन्यांमध्ये सौरभला खेळण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसलीय, प्रेक्षक गॅलरीतून त्याच्या नावाने चिअर अप करताना दिसते, लहान लहान कृतीतून त्यांचे असलेले प्रेम ठळक जाणवते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/VB69PtI
No comments:
Post a Comment