Breaking

Thursday, June 13, 2024

कोकणातील 'या' घाटात दरड कोसळली, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा घाट बंद https://ift.tt/CnV6zTR

रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसात अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते बंद होणे, असे प्रकार घडू लागले आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या अणूस्कुरा घाटात मोठी दरड कोसळल्याने मार्ग बंद झाला आहे. राजापुरात सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अणूस्कूरा घाटात दरड कोसळली असून रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा हा प्रकार घडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून अनुस्कुरा मार्गे कोल्हापूर जिल्ह्यात येणारी वाहतूक सकाळ पर्यंत बंद करण्यात आली आहे. दरड कोसळलेल्या अणूस्कुरा घाटाचे छायाचित्र आले समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन दरड हटवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु सुरू आहे. कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा सर्वात जवळचा घाट म्हणून अणूस्कुरा घाटाची ओळख आहे. पावसाच्या सुरुवातीलाच या घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने भविष्यात या घाटातील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने ही दरड हटवण्यासाठी तातडीने घटनास्थळी एक जेसीबी पाठवला असुन दरड हटवण्याचे काम युध्द पातळीवर सुरु केले आहे . दरवर्षी पावसाळ्यात हा मार्ग धोकादायक बनतो या घाटात अनेकदा दरडी कोसळण्याच्या घटना घडतात त्यामुळे पावसाळ्यात हा मार्ग अनेकदा वाहतुकीसाठी बंद होतो. अशाच प्रकार पहिल्या पावसात यावर्षी घडला आहे. व्यापार उद्दीम यासाठी हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. त्यामुळे या घाटाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी व्यापारी नागरिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Bc3SzVG

No comments:

Post a Comment