Breaking

Friday, June 14, 2024

इंग्लंडच्या विजयानंतर वर्ल्ड कपचे समीकरणच बदलले, सुपर -८ मध्ये पोहोचली का जाणून घ्या.. https://ift.tt/Rru9SOQ

बार्बुदा : इंग्डलच्या ओमाानविरूद्ध विजयाने टी-२० वर्ल्ड कपचे सुपर-८ चे समीकरण बदलले आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि ओमान यांच्यात आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ मधील २८ वा सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्स राखत सामना जिंकला. ओमनच्या या पराभवानंतर आता सुपर- ८ चे समीकरण बदलले आहे.या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत ओमनला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. प्रथम फलंदाजी करताना इंग्लडने ओमानच्या संघाला ४७ धावांवर आटोपले. यानंतर इंग्लंडने ३.१ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले. इंग्लंडचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे. यासह इंग्लंडने सुपर-८ मध्ये पोहोचण्याच्या आशाही जिवंत ठेवल्या आहेत. तर ओमान यापूर्वीच सुपर-८ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. टी- २० विश्वचषक मोहिमेत स्कॉटलंडचा संघ ब गटात आहे. स्कॉटलंडचा संघ तीन सामन्यांपैकी दोन विजयांसह तो दुसऱ्या स्थानावर आहे. स्कॉटलंडच्या खात्यात सध्या ५ गुण आहेत. आता इंग्लंडच्या संघाला सुपर -८ मध्ये पोहचण्यासाठी स्कॉटलंडच्या पराभवी गरज आहे. स्कॉटलंडला त्यांच्या पुढील सामना पराभव मिळावा, अशा आशा इंग्लंच्या चाहत्यांना असेल. कारण इंग्लंडचे नशीब हे स्कॉटलंडचा पराभव आणि पुढील सामन्यातील इंग्लंड विजयावर अवलंबून आहे. इंग्लंडला स्कॉटलंडच्या गुणांची बरोबरी करण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे. ज्यामुळे इंग्लंड आणि स्कॉटलंडचे ५-५ गुण होतील. ओमानविरूद्ध मोठ्या विजयामुळे या संघाचा नेट रनरेट स्कॉटलंडपेक्षा चांगला असेल. यामुळे इंग्लंड सुपर-८ साठी पात्र ठरू शकेल. या स्पर्धेच्या सुरुवातीला इंग्लंडचा पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला. यानंतरच्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरूद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. ज्यामुळे इंग्लंडला सुपर-८ मधून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला. मात्र ओमानविरूद्ध विजयाचा इंग्लंडला मोठा फायदा झाला. ब गटात इंग्लंड ३ गुणांसह तिसऱ्या स्थान मिळवले. त्याचबरोबर इंग्लंडचा नेट रनरेट +३.०८१ वर गेला आहे.हा सामना जिंकून इंग्लंडने आपल्या नेट रनरेटमध्येही लक्षणीय सुधारणा केली आहे. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना आदिल रशीदने सर्वाधिक ४ बळी घेतले. याशिवाय मार्क वूड आणि जोफ्रा आर्चरला ३-३ विकेट्स मिळाल्या. या विजयानंतर आता इंग्लंडच्या चाहत्यांच्या नजरा स्कॉटलंडच्या सामन्यावर असतील.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HI8Lsb

No comments:

Post a Comment