नागपूर: नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत गुरुवारी रात्री उशिरा दाताळा फाट्याजवळ दुचाकीवरून घरी परतणाऱ्या ऑटोचालकाची अज्ञात आरोपींनी हत्या केली. दिनेश हरिदास नागराळे असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून हिंगणा पोलीस अधिक तपास करत आहे. नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत दाताळा फाट्याजवळ कच्च्या रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती ये-जा करणाऱ्यांनी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. बडगाव गुजर येथील ५३ वर्षीय दिनेश हरिदास नागराळे असे मृताचे नाव आहे. दिनेश बुटीबोरीमध्ये ऑटो चालक आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांची पत्नी आशा कामगार म्हणून काम करते. टेंभरी गावात दिनेशचे जुने घर असून तिथे त्याचा भाऊ राहतो. दिनेश रात्री भावाच्या घरी ऑटो सोडून स्प्लेंडर गाडीने घरी परतायचा. गुरुवारी रात्रीही ते दुचाकीवरून घरी परतत असताना अज्ञात आरोपींनी त्याच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली. पोलिसांना घटनास्थळी एक लाकडी दांडा सापडला आहे. दिनेशच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा असून चेहऱ्यावर गंभीर जखमा आहेत. दिनेशचा मोबाईल गायब असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, दिवसभर ऑटो चालवून मिळवलेले सुमारे एक हजार रुपये त्याच्या खिशात असल्याने दरोड्याच्या उद्देशाने खून झाल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्याचे कोणाशीही वैर किंवा भांडण नव्हते. अशा स्थितीत दिनेशची हत्या पोलिसांसाठी एक कोडे बनले असून ते सोडविण्याचा प्रयत्न हिंगणा पोलीस करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/xibL1Yy
No comments:
Post a Comment