Breaking

Tuesday, June 11, 2024

अजितदादांच्या निर्णयांना जनतेपर्यंत पोहोचवा, बोलघेवड्यांना उत्तर देण्यात वेळ दवडू नका, तटकरेंची प्रवक्त्यांना सूचना https://ift.tt/HaWhPYT

मुंबई: लोकसभा निवडणुकीचा परिणाम विधानसभेवर होईल, अशी धास्ती बाळगू नका. तसेच विधानसभेच्या जागावाटपाबाबत काहीही भाष्य करु नका पक्षाचे नेतृत्व त्याची काळजी घेतील. अजित पवार राज्यासाठी करत असलेल्या सकारात्मक निर्णयांची चर्चा करा, विनाकारण बोलघेवड्यांना उत्तर देण्यात वेळ दवडू नका पण, जर विरोधी पक्षांकडून टीका झालीच तर त्याला चोख शब्दांत उत्तर द्या, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांना मंगळवारी केल्या. लोकसभा निवडणुकांमधल्या निराशाजनक कामगिरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मंगळवारी राज्यातील महिला जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांची आणि अल्पसंख्याक सेल व प्रवक्त्यांची बैठक राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत आज प्रदेश कार्यालयात पार पडली.सरकारकडून महिलांच्या सशक्तीकरणासाठी, उन्नतीसाठी ज्या-ज्या योजना अपेक्षित आहेत त्याचा आढावा दोन - चार दिवसात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन येणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव मागणी केली जाणार, असल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी दिली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांचीही बैठक झाली. या बैठकीत तटकरे यांनी प्रवक्त्यांना आक्रमकरित्या पक्षाची भूमिका मांडण्याची सूचना केली. लोकसभा निवडणुकीचा फटका विधानसभेच्या निवडणुकीत बसेल अशी धास्ती बाळगण्याचे कारण नाही. अजित पवार अर्थमंत्री म्हणून उत्तम काम करत असून त्यांच्या कामाचा प्रचार पक्षाकडूनही व्हायला हवा. पण, इतर पक्षांकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात वेळ दवडू नका. पक्षाचा जनाधार काही समाजांमध्ये घटला असला तरीही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची तसेच त्यांच्यापासून अंतर वाढणार नाही याची माध्यमांत बोलताना खबरदारी घ्या, असे तटकरे म्हणाले. तर, विधानसभेच्या जागावाटपाबाबत दुसऱ्या पक्षांनी कितीही दावे केले तरीही त्याला प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता नाही, पण जर कमरेखाली वार झाले तर त्याला चोख उत्तर द्या, असे तटकरे यांनी प्रवक्त्यांना सांगितले. मंगळवारी तटकरे यांनी पक्षाच्या सोशल मीडियाच्या समन्वयकांची बैठक घेतली. त्यानंतर अल्पसंख्याक सेलच्या विभागाचीही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/N4hrbxW

No comments:

Post a Comment