crime case : आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना हैदराबादमध्ये घडली आहे. ३५ वर्षीय डिलिव्हरी एजंटने स्वत:च्याच मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे. ७ जूनला आरोपी बापाने आपली हरवली असा बनाव रचत मियापूर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती पण पोलीसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज मिळाले आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तेरा वर्षीय मुलीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नराधम बापाने मुलीलाच संपवले. आणि तिचा मृतदेह जंगलाच्या मध्यभागी पुरून ठेवला.आरोपी उदरनिर्वाहासाठी सहकुटुंब एक जूनला हैदराबादला स्थलांतरित झाले होते. मियापूरमध्ये मुलीची आई रोजंदारीचे काम करते. सात जूनला सकाळी 9 च्या सुमारास मुलगी आई-वडिलांसोबत न राहण्याची इच्छा व्यक्त करून घरातून निघून गेली. एका नातेवाईकाला मुलगी रस्त्यात दिसली आणि त्याने आरोपीला याची माहिती दिली, त्यानंतर तो तिला शोधण्यासाठी त्याच्या दुचाकीवर निघाला. वडीलांनी मुलीला सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जायला सांगितले. मुलगी जंगलात गेली आरोपी वडील सुद्धा मागोमाग जंगलात गेला आणि तिथेच पोर्नोग्राफीचे व्यसन असलेल्या वडीलाने मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला मुलीने नकार देवून आईला याबद्दल तक्रार करु अशी धमकी दिली हे ऐकून आरोपी वडीलाने मुलीच्या चेहर्यावर वार करुन तिला तिथेच संपवले. यानंतर आरोपी वडीलाने घरी येवून कपडे बदलले परत जावून मुलगी पूर्णपणे मृत झाली का याची खात्री करून घेतली आणि तिला वडीलाने जमिनीत पुरून टाकले. यानंतर आरोपीने स्वत:च मुलगी हरवली अशी तक्रार दाखल केली. पोलीसांनी जेव्हा तपास केला तेव्हा त्यांना वडील आणि मुलगी जंगलात जातानाचं सीसीटीव्ही फुटेज मिळाले यानंतर पोलीसांसमोर नराधम बापाने गुन्हा कबूल केला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/x9FOvnj
No comments:
Post a Comment