नागपूर: नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या मनीष लेआऊटमधील स्वावलंबी नगरमध्ये भीषण अपघात घडला आहे. घराच्या अंगणात खेळणाऱ्या दीड वर्षाच्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रांश आशिष डोनारकर असे मृत मुलाचे नाव आहे. आशिष डोनारकर हे स्वावलंबी नगर येथील हनुमान मंदिराजवळ राहत असून ते एका खासगी कंपनीत काम करतात. घटनेच्या दिवशी दुपारी आशिष कामावर गेले होते. तर त्याची पत्नी घरात कामात व्यस्त होती. त्याचवेळी दीड वर्षाचा रुद्रांश घरात एकटाच खेळत होता. घराच्या बाहेरील अंगणात एका कोपऱ्यात एक विहीर आहे. ती जाळीने अर्धी झाकलेली होती. तर रुद्रांश तिथेच खेळत होता.दरम्यान खेळत असताना खेळता खेळता रुद्रांश अंगणात असलेल्या विहिरीजवळ पोहोचला. याच दरम्यान त्याने विहिरीजवळ ठेवलेली चप्पल विहिरीत फेकून दिली. त्यानंतर तो विहिरीजवळ गेला. काही वेळाने त्याने जवळच असलेल्या विहिरीत डोकावून पाहिले. विहिरीत डोकावून पाहत असताना त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. काही वेळाने आईचे काम संपले. मात्र रुद्रांश न दिसल्याने तिने आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध घेतला असता तिला तो कुठेच दिसला नाही. नंतर तिने विहिरीजवळ जाऊन पाहिले असता तिथे एक चप्पल दिसली. त्यानंतर तिने विहिरीत डोकावून पाहिले असता रुद्रांशचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला. हे पाहताच तिने आरडा ओरडा सुरू केला. त्यानंतर या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/N6JD9MZ
No comments:
Post a Comment