Breaking

Wednesday, June 26, 2024

सेमी फायनलपूर्वी इंग्लंडच्या गोलंदाजांनं नाक कापलं, हातून घडली लाजीरवाणी गोष्ट... https://ift.tt/rp98Rw7

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वर्ल्ड कपच्या सेमी फायनलला आता काही तास उरले आहेत. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी आता इंग्लंडच्या गोलंदाजाने नाक कापले आहे. कारण इंग्लंडच्या खेळाडूच्या हातून आता लाजीरवाणी गोष्ट घडली आहे.भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनलकडे जगभराचे लक्ष लागले आहे. पण इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनच्या नावावर आता नकोशी गोष्ट घडली आहे. ऑलीने इंग्लंडच्या संघाकडून खेळताना दमदार कामगिरी केली होती. पण आता मात्र त्याच्या नावावर इंग्लंडमधील सर्वात वाईट रेकॉर्डची नोंद झाली आहे.ऑली रॉबिन्सनने २०२१ साली इंग्लंडकडून पदार्पण केले होते. त्यानंतर तो २० कसोटी सामने खेळला होता. पण आता मात्र ऑलीने एकाच षटकात ४३ धावा दिल्याचे समोर आले आहे. इंग्लंडमध्ये सध्याच्या घडीला कौंटी क्रिकेट सुरु आहे. ऑली हा ससेक्सकडून खेळत होता आणि त्यांचा लिसेस्टशायरविरुद्ध होता. या सामन्यात ऑलीने तीन नो बॉल टाकले, त्यामुळे त्याचे हे षटक ९ चेंडूंचे झाले. या सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील लुईस किंबरने तब्बल पाच षटकार लगावले आणि यामधील तीन षटकार नो बॉलवर आले. ऑलीच्या या एका षटकात, तीन चौकार आणि चार षटकार मारले गेले, तर एक एकेरी धाव आली. हे दुसऱ्या डावातील ५९ वे षटक ऑली टाकत होता. यावेळी लुईसने त्याच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला आणि त्यामुळेच हा नकोसा विक्रम ऑलीच्या नावावर जमा झाला आहे.ऑलीच्या गोलंदाजीवर धडाकेबाज फटकेबाजी करणाऱ्या लुईसने या ५९ व्या षटकापूर्वी ५६ चेंडूंत ७२ धावा केल्या होत्या, पण या षटकानंतर लुईसच्या नावावर ६५ चेंडूंत १०९ धावा झाल्या होत्या. या एका षटकात तुफानी फटकेबाजी करत लुईसने आपले शतकही यावेळी साजरे केले. त्यामुळे कौंटी सामन्यात चाहत्यांना टी-२० क्रिकेटचा आनंद लुटता आला. इंग्लंडकडून एका षटकात काढलेल्या या सर्वाधिक धावा असल्याचे आता समोर आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Rx9IV8n

No comments:

Post a Comment