गयाना : भारत आणि इंग्लंड यांच्यात सेमी फायनलचा सामना रंगणार आहे. पण हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर फायनलमध्ये कोणता संघ जाणार, याबाबतचा नियम आता समोर आला आहे.
भारत-इंग्लंड सेमी फायनलमध्ये पावसाची किती शक्यता आहे...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल प्रोव्हिडन्स येथे होणार आहे. या सामन्याच्यावेळी ७० टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जेव्हा ५० टक्क्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता असते, तेव्हा हा सामना पूर्ण होणे कठीण असते. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.या सामन्याला राखीव दिवस आहे की नाही....
वर्ल्ड कपमधील महत्वांच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला जातो. पण भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जर हा सामना गुरुवारी होऊ शकला नाही तर हा सामना थेट रद्द केला जाणार आहे.पावसामुळे सामना रद्द झाला तर काय आहेत नियम...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना समान एक गुण दिला जाणार असल्याचे आता समोर आले आहे. कारण जर सामना झाला आणि जो संघ विजयी ठरला तो थेट फायनलमध्ये जातो. पण सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना समान न्याय या नात्याने प्रत्येकी एक गुण दिला जाऊ शकतो.सेमी फायनल रद्द झाली तर फायनलमध्ये कोणता संघ पोहोचणार....
सेमी फायनलचा सामना पावसामुळे रद्द झाला तर सुपर ८ गटात काय परिस्थिती होती, हे सर्वात महत्वाचे ठरेल. इंग्लंडचा संघ हा सुपर ८ मध्ये दुसऱ्या गटात होता. या गटात अव्वल स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा संघ होता, त्यांच्या खात्यात ६ गुण होते. या गटात दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा संघ होता आणि त्यांच्या खात्यात ४ गुण होते. दुसरीकडे भारतीय संघ पहिल्या गटात होता आणि त्यांच्या खात्यात सहा गुण होते. त्यामुळे सुपर ८ फेरीत इंग्लंडपेक्षा भारताचे गुण जास्त आहेत. त्यामुळे जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे.भारत आणि इंग्लंड सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे या सामन्याचा निकाल गुरुवारी लागणार आहे. जर या सामन्यात पावसामुळे एकही चेंडू पडला नाही तर भारत थेट अंतिम फेरीत दाखल होणार आहे. त्यामुळे पाऊस या सामन्यात भारतीय संघाच्या पथ्यावर पडू शकतो, असे आता म्हटले जात असल्याचे समोर आले आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/sHwymOB
No comments:
Post a Comment