जितेंद्र खापरे, नागपूर : जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या केलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने नागपुरात निदर्शने केली. मात्र, या निदर्शनांदरम्यान मोठा अपघात झाला. निदर्शने करताना पुतळे जाळण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी पुतळ्यावर पेट्रोल टाकले. त्यामुळे आग भडकली आणि तीन कार्यकर्ते भाजपे गेले. जखमी कार्यकर्त्यांवर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या सोहळ्यादरम्यान जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याविरोधात विश्व हिंदू परिषदने देशभरात निदर्शने सुरू केली आहेत. बुधवारी सायंकाळी नागपूर येथील संघ मुख्यालयाजवळील बडकस चौकात विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे प्रदेश मंत्री गोविंद शेडें यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधात निदर्शने करत एका दहशतवाद्याचा पुतळाही जाळला. पुतळा दहन करताना उत्साही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्या पुतळ्यावर पेट्रोल ओतले आणि आग लावली. मात्र पुतळ्याला आग लावताना भडका उडाला आणि त्यात तीन कार्यकर्ते भाजले गेले. त्यातल्या एका कार्यकर्ताचा खांदा भाजला गेला होता. त्याला तात्काळ बाहेर काढण्यात आले. उर्वरित दोन कार्यकर्त्यांचे हात आणि केस, एकाचा पाय भाजला. त्यामुळे काही काळ आंदोलन थांबवून तिघांनाही तातडीने शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू असताना पाकिस्तान सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. पुतळा दहन दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केला. मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य केले नाही. यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धंतोली परिसरात दहशतवाद्यांविरोधात निदर्शने केली असून दोन कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले होते. आजही कार्यकर्ते पूर्ण उत्साहात आंदोलन करत असताना एका कार्यकर्त्याने पुतळ्यावर पेट्रोल ओतून आग लावली, पुतळ्याने अचानक पेट घेतला आणि तीन कार्यकर्ते जखमी झाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/bhCVTtQ
No comments:
Post a Comment