प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात दत्तारी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री यांचा मोठा विजय झाला आहे. या विजयानंतर नारायण राणे यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. कोकणात भाजपाचे कमळ पहिल्यांदाच फुललं आहे, ज्याने या निवडणुकीत मला अपशकुन केलं, त्यांना मला एकच सांगायचं आहे 'अब की बार आने वाले चुनाव मे मेरी बारी है' असा थेट सुचक इशाराच केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांनी हा दिलेला सूचक इशारा नक्की कोणासाठी होता, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहेहा विजय आपल्या कार्यकर्त्यांचा आहे. सगळ्यांची मेहनत आहे, तसेच या विजयात निलेश, नितेश आणि माझी पत्नी तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच सावंतवाडी मतदारसंघात मला दीपक केसरकर यांनी मोठे मताधिक्य दिले आहे. तसेच मंत्री उदय सामंत यांचाही माझ्या विजयात मोठा वाटा आहे अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाचे आमदार असलेल्या कुडाळ मालवण या मतदारसंघातही आपल्याला लीड मिळाली आहे, याबद्दल बोलताना राणे म्हणाले, की हेच तर माझं नाविन्य आहे. जिथे पिकलं जात नाही तिथे मी पिकवतो हे आपलं वैशिष्ट्य आहे, अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली. कोकणात कमळ फुललं आहे. त्यामुळे आपल्याला बरं वाटतंय, गोड गोड वाटतंय अशी ही आनंदी प्रतिक्रिया त्यांनी दिली.कोकणात रायगड, रत्नागिरी आणि रत्नागिरी - सिंधुदुर्ग या दोन्ही ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला. याबद्दल बोलताना राणे म्हणाले, की इतक्या चांगल्या क्षणी त्यांचे नाव नका घेऊ. ते कुणीकडे लंडनला वगैरे असतील त्याना हवा होऊ दे असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. आता मेरी बारी है ज्यांचं नाव घेतलं ना त्यांचं कोकणात नामोनिशाण मी ठेवणार नाही, असाही इशारा राणे यांनी दिला.रत्नगिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील लोकांनी मला भरभरून मतदान दिलं आहे, त्यामुळे मला त्यांना विकास दाखवायचा आहे. त्यांची सेवा करायची आहे. आता या विजयामुळे जे कोकण आमचं म्हणत होते ते आता कोकण कोणाच आहे हे मी सिद्ध केलं आहे. मतदान केंद्रावरती आपण सकाळपासून हजर होतात मात्र विरोधक इकडे फिरकले नाहीत, यावर राणे म्हणाले की आपण ज्या रस्त्याने जातो त्या ठिकाणी विरोधक फिरकतही नाहीत आणि त्याचा प्रत्येय तुम्हाला इथे आला, अशा शब्दात राणे यांनी विरोधकांनाही सुनावलं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/qyBNRF9
No comments:
Post a Comment